Sunday, June 28, 2015

Talathi Sample Questions

Though this blog is started to help MPSC aspirants but this question bank is similarly important for Talathi Exam.

We have more than 1680 sample questions for Talathi Exam preparation.

Sunday, June 21, 2015

MPSC Sample Question Paper 84

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी (Generate count) करण्याचा पहिला प्रयत्न खालीलपैकी कोणी केला?
१) दादाभाई नौरोजी    २) पं. मदन मोहन मालवीय    ३) डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव   ४) डॉ. धनंजयराव गाडगीळ

२) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर दरडोई वार्षिक उत्पन्नवाढीच्या......
१) दरापेक्षा सातत्याने जास्त राहिला आहे.    २) दराइतकाच राहिला आहे.   ३) दरापेक्षा नेहमीच कमी राहिला आहे.    ४) दरास समांतर राहिला आहे.

३) अकराव्या पंचवार्षिक योजनेचा (Plan) कालावधी खालीलपैकी केव्हा संपुष्टात आला?
१) ३१ मार्च, २०१०     २) ३१ मार्च, २०१२     ३) ३१ मार्च, २०११      ४) ३१ मार्च, २०१३

४) स्वातंत्र्यात्तर काळात भारतातील लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर.......
१) वाढत आहे.      २) स्थिर आहे.      ३) कमी होत आहे.       ४) मध्यम आहे.

५) सुधारित अंदाजानुसार (Improved Andajanusar) सन २०१२ - १३ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या किती टक्के खर्च शिक्षणावर केला गेला?
१) ३.१      २) २.९       ३) ३.३       ४) ४.१

६) आर्थिक विकास (Economic Development) प्रक्रियेत खालीलपैकी कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा असतो?
१) लोकसंख्यावाढीचा वेग    २) व्यवहार तूट     ३) भांडवल उत्पादनाचे प्रमाण    ४) बचत-गुंतवणुकीचे राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण

७) भारतात अधिकृतरीत्या (Authorized) मान्य केलेली दारिद्र्यरेषेची कल्पना......
१) संकुचित आहे.    २) समाधानकारक आहे.     ३) सवर्समावेशक आहे.   ४) सापेक्ष आहे.

८) सन २००१ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येत ६० वर्षे वयापुढील लोकसंख्येचे प्रमाण ७.४ टक्के इतके होते. सन २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ........ इतके झाले आहे.
१) ८.३ टक्के      २) ८.६ टक्के     ३) ७.९ टक्के     ४) ८.१ टक्के

९) १) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक (primary) निष्कर्षानुसार देशात ६,४०,९३० खेडी आहेत.
२) उपरोक्त निष्कर्षानुसार भारतातील शहरांची संख्या ७,९३३ आहे.
३) उपरोक्त निष्कर्षानुसार देशातील जिल्ह्यांची संख्या ६४० आहे.
१) फक्त पहिले विधान बरोबर आहे.           २) फक्त पहिले व तिसरे विधान बरोबर आहे.   
३) फक्त दुसरे व तिसरे विधान बरोबर आहे.    ४) तिन्ही विधाने बरोबर आहेत.

१०) भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक (Dedicator) ठरेल?
१) विकसित       २) विकसनशील      ३) अविकसित    ४) गरीब

११) राष्ट्रीय नमुना पाहणीच्या एकसष्टाव्या फेरीतील सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार (युनिफोर्म रिकॉल पिरिअड) (Uniform Recall Period) सन २००४-०५ मध्ये भारतातील किती टक्के लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली होती?
१) २१.८      २) २५.७     ३) २७.५      ४) २२.१

१२) राष्ट्रीय नमुना पाहणीच्या पंचावन्नाव्या फेरीतील सर्वेक्षणानुसार भारताच्या शहरी भागात दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण ....... टक्के इतके होते.
१) २३.६२     २) २५.१९     ३) २७.०९      ४) २९.०७

१३) सन २००१ मधील जनगणना (Census) देशातील ५९३ जिल्ह्यांमध्ये पार पडली. सन २०११ मधील जनगणना देशातील एकूण किती जिल्ह्यांत घेतली गेली?
१) ५६३      २) ६४०      ३) ६१३      ४) ६२३

१४) भारतातील देशांतर्गत बचतीमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे?
१) कृषी क्षेत्र     २) सेवाक्षेत्र     ३) उद्योग क्षेत्र      ४) घरगुती क्षेत्र

१५) अर्थव्यवस्थेतील वृद्धी मोजण्याचे सर्वांत सुयोग्य परिमाण खालीलपैकी कोणते?
१) स्थूल देशांतर्गत उत्पन्न (GDP)     २) निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNP)     ३) दरडोई उत्पन्न      ४) दरडोई खर्च

१६) भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज वर्तविला जातो?
१) मध्यवर्ती सांख्यिकी संघटना    २) भारतीय सांख्यिकी संस्थान    ३) उत्पन्न-अंदाज समिती     ४) राष्ट्रीय उत्पन्न आयोग

१७) सन १९९१ मधील राष्ट्रीय औद्योगिक धोरणानुसार फक्त दोनच उत्पादक उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवले गेले (Total Engaged Tevle). हे उद्योग म्हणजे .....
१) कोळसा आणि खनिज तेल    २) लोह आणि खनिज तेल    ३) संरक्षण आणि खनिज तेल    ४) संरक्षण व जहाजबांधणी

१८) ............ यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत 'संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना' SGRY व 'सुवर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना' (Suvarnjaynti village self-employment scheme) कार्यान्वित झाल्या.
१) अटलबिहारी वाजपेजी     २) पी.व्ही. नरसिंहराव     ३) इंद्रकुमार गुजराल     ४) व्ही. पी. सिंग

१९) सन २०१४ मधील उपलब्ध माहितीनुसार सन २०११-१५ या कालावधीतील भारतीय पुरुषांची अंदाजित सरासरी आयुर्मर्यादा किती वर्षे आहे?
१) ६२.९      २) ७२.०      ३) ६७.३      ४) ६४.३

२०) सन २०१४ मधील उपलब्ध माहितीनुसार सन २०१२ मध्ये भारतातील मृत्युदर (Death rate) हजारी ............. इतका होता.
१) ७.०       २) ८.६     ३) ८.८      ४) ८.९

उत्तर :
१) १    २) १     ३) २     ४) ३    ५) ३     ६) ४     ७) १     ८) २     ९) ४     १०) २
११) ३   १२) १    १३) २    १४) ४    १५) १     १६) १    १७) ३     १८) १     १९) ३    २०) १

Friday, April 10, 2015

MPSC Sample Question Paper 83

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) 'आझाद हिंद सेने' च्या अधिकाऱ्यांवरील खटल्यात जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे वकीलपत्र (lawyer) घेतले होते. हे खटले खालीलपैकी कोठे चालविले गेले?
१) दिल्ली उच्च न्यायालयात   २) आर्याच्या किल्ल्यात    ३) दिल्लीच्या लाल किल्ल्यात         
४) अहमदनगरच्या किल्ल्यात

२) आझाद हिंद सेनेने अंदमान-निकोबार ही बेटे ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना ______ अशी नावे दिली होती.
१) सुभाष व जवाहर    २) गांधी व सुभाष    ३) शहीद व स्वराज्य    ४) आझाद व नेहरू

३) खालीलपैकी कोण 'गदर' हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवीत होते?
१) रासबिहारी बोस     २) श्यामजी कृष वर्मा     ३) लाला हरदयाळ     ४) स्वातंत्र्यवीर सावरकर

४) इ. स. १९०८ मधील टिळकांवरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
१) चित्तरंजनदास     २) गणेश वासुदेव जोशी     ३) बॅ. महंमदअली जीना     ४) दावर व मॅथ्यू

५) मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी ______ हा ग्रंथ लिहिला.
१) आर्क्टिक होम इन दी वेदाज     २) गीतारहस्य     ३) ओरायन     ४) प्रतियोतीगा सहकार

६) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे दरबार भरवून _______ यांनी बंगालची फाळणी रद्द केली.
१) व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन    २) सम्राट पंचम जॉर्ज    ३) राणी व्हिक्टोरिया     ४) लॉर्ड हार्डीग्ज

७) 'पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम सन १९३३ मध्ये 'नाऊ ऑर नेव्हर' या पुस्तकात वापरला गेला. हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते?
१) डॉ. महंमद इक्बाल    २) बॅ. महंमदअली    ३) रहमत खान    ४) सर सय्यद अहमदखान

८) सन १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय असंतोष प्रकट (dissatisfaction expressed) करण्यासाठी _______ या नव्या मार्गाची घोषणा केली.
१) असहकार      २) बहिष्कार    ३) सत्याग्रह     ४) प्रतियोगिता सहकार

९) जालियनवाला बाग, अमृतसर येथे
 निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार (inhuman Fire) करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव _______
१) जनरल डायर     २) ले. गव्हर्नर ओडवायर     ३) कमिशनर रँड      ४) ले. गव्हर्नर फुल्लर

१०) जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने _____ कमिशन नेमले होते.
१) हंटर      २) महात्मा गांधी     ३) सायमन      ४) जयकर

११) खालीलपैकी कोणाचा खिलाफत चळवळीस तीव्र वीरोध होता आणि हा अंतरराष्ट्रीय प्रश्न मुस्लीम लीगने दत्तक घेऊ नये, अशी प्रामाणिक भूमिका होती?
१) मौलाना आझाद    २) मौलाना शौकत अली     ३) बॅ. महंमद अली जीना     ४) सर सय्यद अहंमद खान

१२) 'रौलट बिलाविरुध्द गांधींनी सत्याग्रह सुरू केला त्यात भाग घेण्यासाठी मी हजर नव्हतो, ऐवढेच मला वाईट वाटते' हे उदगार कोणाचे?
१) लोकमान्य टिळक    २) पं. मोतीलाल नेहरू    ३) पं. जवाहरलाल नेहरू     ४) सुभाषचंद्र बोस

१३) कोणती जोडी चुकीची आहे?
१) स्वातंत्र्यवीर सावरकर : जोसेफ मॅझिनीचे चरित्र     २) आचार्य कृपालिनी : दी इंडियन स्ट्रगल
३) जवाहरलाल नेहरू : ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी    ४) डॉ. राजेन्द्रप्राद : दी साँग ऑफ इंडिया

१४) अन्हॅपी इंडिया' या पुस्तकाचे लेखक _______
१) दादाभाई नौरोजी     २) लाला लजपतराय    ३) मौलाना आझाद     ४) जवाहरलाल नेहरू

१५) ________ यांची 'जालियनवाला बाग' ही कविता एके काळी अत्यंत गाजली होती.
१) केशवसुत     २) कुसुमाग्रज     ३) गोविंदाग्रज     ४) यशवंत

१६) 'गांधी व्हर्सेस लेनिन' या पुस्तकाचे लेखक ______
१) श्रीपाद अमृत डांगे    २) नारायणराव लोखंडे     ३) राममनोहर लोहिया     ४) वसंतराव तुळपुळे

१७) दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यात महात्माजी ______ हे वृत्तपत्र चालवीत.
१) इंडियन ओपिनियन   २) दी सत्याग्रह      ३) इंडिया गॅझेट       ४) ब्लॅक्स अँड व्हाइट्स

१८) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म _______ येथे झाला.
१) रत्नागिरीजवळ चिखली    २) दापोलीजवळ आंबावडे     ३) इंदूरजवळ महू     ४) मराठवाड्यात औरंगाबाद

१९) खालीलपैकी कोणास आपण 'मुस्लीम लीग' चे संस्थापक म्हणून ओळखतो?
१) बॅ. महंमदअली जीना    २) आगाखान     ३) सर सय्यद अहमदखान      ४) नवाब सलिमुल्ला

२०) 'चौरीचौरा' येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली?
१) १९१९      २) १९२२     ३) १९२६       ४) १९३०

उत्तर :
१) ३    २) ३     ३) ३     ४) ३    ५) २     ६) २     ७) ३     ८) ४     ९) १     १०) १
११) ३   १२) १    १३) ४    १४) २    १५) २     १६) १    १७) १     १८) ३     १९) ४    २०) २

Thursday, February 19, 2015

MPSC Sample Question Paper 82

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) उत्पन्न-करात सूट देऊन तो पैसा बचतीकडे वळविणे हा किंमतवाढीस आळा घालण्याचा एक उपाय होऊ शकतो; असे म्हणणे ......
१) चूक आहे     २) अर्थशास्त्रास
economics धरून नाही     ३) व्यवहार्य नाही     ४) बरोबर आहे

२) खालीलपैकी कशाचा निर्देश किंमतवाढीस आळा घालण्याचा एक उपाय म्हणून करता येणार नाही?
१) बँकदर वाढविणे  २) शासकीय खर्चात वाढ करणे  ३) बचतीस उत्तेजन देणे   ४) अर्थव्यवस्थेतील तूट कमी करणे

३) चक्रवर्ती समितीने चलनफुगवटा हेच भाववाढीचे एकमेव कारण आहे; असे सांगताना त्यास जबाबदार घटक म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाचा निर्देश केला आहे?
१) कृषिउत्पन्नातील चढ-उतार    २) जागतिक भाववाढीचे भारतातील आगमन    ३) रिझर्व्ह बँकेचे शिथिल धोरण    ४) चलनधोरणाचा अभाव
१) १ व २        २) १ व ३       ३) ३ व ४        ४) १ व ४

४) किंमत निर्देशांकाचे प्राथमिक
the primary index value, इंधन आणि उत्पादित माल हे जे तीन किंमतगट आहेत, त्यांपैकी कोणत्या गटाची किंमत वाढल्याने सर्वसामान्य किमतीही वाढल्या जातात, असा अनुभव आहे?
१) प्राथमिक     २) इंधन      ३) उत्पादित     ४) यापेक्षा वेगळे उत्तर     

५) दुहेरी किमतीची पद्धती भारतात खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या बाबतीत सर्वप्रथम स्वीकारली गेली?
१) साखर       २) सिमेंट       ३) पोलाद         ४) तांदूळ

६) ...... हा भारतात सामान्यतः मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेला किंमत निर्देशांक होय.
१) घाऊक किंमत निर्देशांक     २) प्रागतिक किंमत निर्देशांक      ३) सुवर्ण किंमत निर्देशांक
index     ४) प्राथमिक वस्तू निर्देशांक

७) कमीत कमी किती कालावधीकरता घाऊक किंमत निर्देशांक काढण्यात येतो?
१) पंधरवडा       २) ३ आठवडे      ३) एक आठवडा       ४) महिना

८) पुढीलपैकी कोणता एक उपाय किंमतवाढ नियंत्रणासाठीचा राजकोषीय
fiscal उपाय नाही?
१) सार्वजनिक खर्चात कपात करणे.     २) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर वाढविणे.     ३) सार्वजनिक कर्जाची परतफेड करणे.     ४) वैधानिक रोखता गुणोत्तर वाढवणे.

९) किंमत निर्देशांक हे एक साधन असून ते किमतीमधील _______ मापन करण्यासाठी वापरले जाते.
१) अर्थशास्त्रीय वाढीचे      २) सांख्यिकीय बदलांचे      ३) भूमितीय घटीचे      ४) व्यावहारिक स्थिरतेचे

१०) दीर्घकाळाचा विचार करता किंमत नियंत्रणाची खालीलपैकी कोणती पद्धती सयुक्तिक
meta ठरेल?
१) तुटीचे अंदाजपत्रक    २) शिलकी अंदाजपत्रक      ३) बँकदर कमी करणे       ४) उत्पादनवाढ

११) प्रामुख्याने पैशाच्या विनिमय कार्यावर भर देणारा पैशाचा प्रकार खालीलपैकी कोणता?
१) M1           २) M2        ३) M3       ४) M4

१२) जेव्हा वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ होते त्या वेळी पैशाचे _______
१) मूल्य वाढते    २) मूल्य त्याच प्रमाणात राहते.     ३) मूल्य कमी होते.   ४) मूल्य स्थिरच असते.

१३) खालीलपैकी कशाचा किंमतवाढ रोखण्याचा एक मार्ग म्हणून निर्देश करता येणार नाही?
१) अंदाजपत्रकीय तुटीत वाढ करणे.     २) काही काळ नोकरभरती बंद ठेवणे.     ३) सक्तीची बचत योजना जाती करणे.   ४) जीवनावश्यक वस्तूंची आयात करणे.

१४) खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या बाबतीत शासनाने दुहेरी किमतीचे धोरण बहुतांशी यशस्वीरित्या अवलंबिले आहे?
१) मीठ       २) पेट्रोल       ३) कापड        ४) साखर

१५) खालीलपैकी कोणत्या कारणाचा मागणीअंतर्गत किंमतवाढीच्या कारणांमध्ये समावेश करता येणार नाही?
१) चलनपुरवठ्यात वाढ   २) काळ्या पैशांत वाढ  ३) तुटीचा अर्थभरणा  ४) मूलभूत उद्योगांचा अपुरा विकास

१६) खालीलपैकी कशाचा उल्लेख किंमतवाढीचे कारण म्हणून करता येणार नाही?
१) तुटीची अर्थव्यवस्था  २) अतिरिक्त लोकसंख्यावाढ  ३) चैनीच्या महाग वस्तूंची आयात ४) बँकदरातील वाढ

१७) खालीलपैकी कोण भारतातील अन्नधान्याचा शिलकी साठा व तत्सम बाबींशी संबंधित आहे?
१) फूड कॉपेरिशन ऑफ इंडिया  २) अॅगमार्क    ३) कृषी किंमत आयोग    ४) आयएसआय

१८) भारतात अन्नधान्याचा किमान शिलकी साठा किती असणे योग्य मानले जाते?
१) १६.८ कोटी टन    २) १.६८ कोटी टन      ३) १६.८ लाख टन      ४) १६८ दशलक्ष टन

१९) पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे खर्च-दाब निर्मित चलनवाढीची
inflation स्थिती निर्माण होत नाही?
१) कामगारांना त्यांच्या उत्पादनापेक्षा जादा वेतन दिले जाणे.   २) उत्पादन घटकांच्या किमतीत वाढ होणे.    ३) अप्रत्यक्ष करांचे दर वाढणे.  ४) तुटीचा अर्थभरणा

२०) खालीलपैकी कशाचा उल्लेख भाववाढीचे
price rise एक वैशिष्ट्य म्हणून करता येणार नाही?
१) किंमतपातळीत सातत्याने वाढ  २) अतिरिक्त प्रमाणात पैशाचा पुरवठा   ३) पतपैशाचा विस्तार ४) अपुरे कृषी उत्पादन


उत्तर :
१) ४    २) २     ३) १     ४) २    ५) ३     ६) १     ७) ३     ८) ४     ९) १     १०) ४
११) १   १२) ३    १३) १    १४) ४    १५) ४     १६) ४    १७) १     १८) २     १९) ४    २०) ४

Thursday, February 12, 2015

राज्य व संघराज्य लोकसंख्या Rājya va saṅgharājya lōkasaṅkhyā


राज्य व संघराज्य States / Federation एकूण लोकसंख्या टक्केवारी
उत्तर प्रदेश  Uttar Pradesh १९,९८,१२,३४१ १६.५०
महाराष्ट्र Maharashtra ११,२३,७४,३३३ ९.२८
बिहार Bihar १०,४०,९९,४५२ ८.६०
पश्चिम बंगाल West Bengal ९,१२,७६,११५ ७.५४
मध्य प्रदेश Madhya Pradesh ७,२६,२६,८०९ ६.००
तमिळनाडू Tamil Nadu ७,२१,४७,०३० ५.९६
राजस्थान Rajasthan ६,८५,४८,४३७ ५.६६
कर्नाटक Karnataka ६,१०,९५,२९७ ५.०५
गुजरात Gujarat ६,०४,३९,६९२ ४.९९
आंध्र प्रदेश Andhra Pradesh ४,९३,८६,७९९ ४.०८
ओडिशा Odisha ४,१९,७४,२१८ ३.४७
तेलंगाणा Telangana ३,५१,९३,९७८ २.९१
केरळ Kerala ३,३४,०६,०६१ २.७६
झारखंड Jharkhand ३,२९,८८,१३४ २.७३
आसाम Assam ३,१२,०५,५७६ २.५८
पंजाब Punjab २,७७,४३,३३८ २.२९
छत्तीसगढ Chhattisgarh २,५५,४५,१९७ २.११
हरियाना Haryana २,५३,५१,४६२ २.०९
दिल्ली Delhi १,६७,८७,९४१ १.३९
जम्मू आणि काश्मीर Jammu and Kashmir १,२५,४१,३०२ १.०४
उत्तरखंड Uttarakhand १,००,८६,२९२ ०.८३
हिमाचल प्रदेश Himachal Pradesh ६८,६४,६०२ ०.५७
त्रिपुरा Tripura ३६,७३,९१७ ०.३०
मेघालय Meghalaya २९,६६,८८९ ०.२५
मणिपूर Manipur २८,५५,७९४ ०.२४
नागालँड Nagaland १९,७८,५०२ ०.१६
गोवा Goa १४,५८,५४५ ०.१२

Tuesday, February 10, 2015

MPSC Sample Question Paper 81

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न१) "ब्रिटिश शासन गाभ्यापासून सडलेले, भ्रष्टाचारी, जुलूम-जबरदस्ती
Force-force करणारे व संकुचित प्रवृत्तीचे आहे" या शब्दांत भारतीय राष्ट्रीय चळवळीत धडाडीने सहभागी झालेल्या _____ या आयरिश विदुषीने ब्रिटिश सरकारची संभावना केली.
१) मादाम कामा     २) डॉ. ऑनी बेझंट      ३) मागरिट नोबेल     ४) भगिनी निवेदिता

२) वेव्हेल योजनेच्या अपयशाचे वर्णन "भारतीय राजकारणाच्या प्रवाहाला अडथळा
disability आणणारा ऐतिहासिक बांध" या शब्दांत केले जाते; कारण _____
१) या योजनेने पाकिस्तानची मागणी मान्य केली.
२) या योजनेअन्वये मुस्लीम लीगला एक प्रकारे नकाराधिकार वापरण्याचाच हक्क मिळाला.
३) या योजनेअन्वये मुस्लीम लीगला भारतीय मुस्लीमांची एकमेव प्रातिनिधिक संघटना मानले गेले.
४) कॉंग्रेस आणि लीग या दोहोंना एकाच मापाने मोजण्यात आले.

३) 'दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' या ग्रंथात _______ या निवृत्त सनदी
retired IAS अधिकाऱ्याने इ.स. १७५७ पासूनच्या वसाहतवादी राजवटीच्या आर्थिक परिणामांचा तपशिलवार परामर्श घेतला आहे.
१) दादाभाई नौरोजी     २) रोमेशाचंद्र दत्त     ३) जी. सुब्रमण्यम अय्यर     ४) व्योमेशचंद्र बॅनर्जी

४) २६ मार्च, १९०२ रोजी ______ यांनी अंदाजप्रत्राकावरील आपले पहिले भाषण संसदेत केले आणि 'हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटू' म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली.
१) दादाभाई नौरोजी      २) जी.व्ही. जोशी     ३) गोपाळ कृष्ण गोखले     ४) फिरोजशहा मेहता

५) सन १८५७ च्या उठावाच्या वेळी ______ हे क्रांतिकारकांनी क्रांतिचे प्रतीक ठरविले होते.
१) जळता निखारा    २) लाल कमळाचे फूल      ३) तलवार      ४) गुलाबाचे फूल

६) ३० जून, १८५७ रोजी ______ यांना क्रांतिकारकांनी 'पेशवा'
Peshwa म्हणून जाहीर केले होते.
१) नानासाहेब      २) तात्या टोपे      ३) तिसरा बाजीराव     ४) चिमासाहेब

७) ______ या व्हाईसरॉयची तुलना मोगल अमदानीतील औरंगजेबाशी केली जाते.
१) लॉर्ड लिटन      २) लॉर्ड रिपन    ३) लॉर्ड कर्झन      ४) लॉर्ड कॅनिंग

८) आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत, असे जाहीर करणाऱ्या ______ या मुस्लीम समाजातील सुधारकाने मुस्लीम, हिंदू व ख्रिश्चन धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी पंजाबमध्ये 'अहमदीया'
ahamadiya ची स्थापना केली.
१) सर सय्यद अहमदखान  २) मौलवी चिरागअली ३) मिर्झा गुलाम महंमद ४) मौलवी लियाकतअली

९) 'मुंबई बेट' हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स _____
१) याने पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले.               २) याने मोगलांकडून जिंकून घेतले.
३) याच्या मते लंडनहून सुंदर शहर होते         ४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले.

१०) नवाबाच्या सत्तेचा आभासात्मक डोलारा कायम ठेवावयाचा; पण खरी सत्ता आपल्याच हाती ठेवावयाची अशा प्रकारची दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये ____ याने अमलात आणली.
१) रॉबर्ट क्लाईव्ह    २) वॉरन हेस्टींग्ज     ३) सर आयर कूट     ४) मॅक्फरसन

११) नाशिकचे जिल्हा न्यायाधीश जॉक्सन यांनी स्वा. सावरकरांचे वडील बंधू बाबाराव यांना २५ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा
Education of black water दिली होती. २१ डिसेंबर, १९०९ जोरी नाशिक येथे जॉक्सनचा वध करून त्याचा बदला ______ याने घेतला.
१) मदनलाल धिंग्रा     २) अनंत कान्हेरे      ३) वासुदेव गोगटे      ४) बाबू गेनू

१२) खालीलपैकी कोणी '१८५७ चे स्वातंत्रसमर' हा ग्रंथ लिहिला?
१) स्वातंत्रवीर सावरकर     २) लोकमान्य टिळक     ३) बाबाराव सावरकर       ४) न्यायमूर्ती रानडे

१३) कायदेमंडळाच्या निवडणुकांत भाग घेऊन कायदेमंडळात प्रवेश मिळविण्यासाठी __________ यांनी १ जानेवारी, १९२३ रोजी अलाहाबाद येथे 'स्वराज्य पक्षा' ची स्थापना केली.
१) चित्तरंजनादास व मोतीलाल नेहरू     २) न.चिं. केळकर व लाला लजपतराय     ३) चित्तरंजनदास व जवाहरलाल नेहरू    ४) मोतीलाल नेहरू व विठ्ठलभाई पटेल

१४) सन १९४२ च्या 'चले जाव' चळवळीचा समुदा कोणी तयार केला होता?
१) युसुफ मेहेरअली      २) अरुणा असफअली     ३) पंडित जवाहरलाल नेहरू      ४) सरदार पटेल

१५) ________ या भारतीय राजकीय विचारवंतास आपण 'पक्षविरहित राजकारण' या संकल्पनेचा जनक म्हणून ओळखतो.
१) फिरोजशहा मेहता    २) श्रीपाद अमृत डांगे      ३) मानवेंद्रनाथ रॉय     ४) एस. एम. जोशी

१६) सर व्हॅलेंटिन चिरोल हे लोकमान्य टिळकांना '_______' असे संबोधत.
१) तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी    २) भारतीय असंतोषाचे जनक     ३) बहिष्कार चळवळीचे जनक   
४) जहालवादाचे जनक

१७) सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन १९०४ मध्ये ______ ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली.
१) अभिनव भारत     २) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ     ३) क्रांतिसेना       ४) अनुशीलन समिती

१८) _______ यांनी लाहोर येथे 'दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज' ची स्थापना केली.
१) लाला हंसराज     २) लाला लजपतराय     ३) गुरुदत्त विद्यार्थी     ४) स्वामी श्रद्धानंद

१९) दिल्ली या नव्या राजधानीत प्रवेश करीत असताना व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यात आला; परंतु तो बचावला. हार्डिंग्जवर बॉम्ब कोणी फेकला होता?
१) सुभाषचंद्र बोस     २) रासबिहारी बोस    ३) अरविंद घोष     ४) लाला हरदयाळ

२०) स्वदेशीची चळवळ देशभर पसरविण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यावे लागते?
१) दादाभाई नौरोजी     २) सार्वजनिक काका     ३) बाळ गंगाधर टिळक      ४) न्या. म. गो. रानडे


उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) ३    ५) २     ६) १     ७) ३     ८) ३     ९) ४     १०) १
११) २   १२) १    १३) १    १४) ३    १५) ३     १६) २    १७) १     १८) १     १९) १    २०) ३

Saturday, January 31, 2015

भूमी व पाणी यांची उष्णता- ग्रहणक्षमता Bhūmī va pāṇī yān̄cī uṣṇatā- grahaṇakṣamatā

भूमी व पाणी यांच्या उष्णता ग्रहण करण्यात जो फरक असतो तो भूमी आणि जलाशयाच्या गुणधर्मांतील भिन्नतेमुळे आणि म्हणूनच भूमी आणि जलाशय भिन्न भिन्न प्रमाणात उष्णता ग्रहण करतात.
 
- पाण्याची विशिष्ट उष्णता ही भूमीच्या मानाने पुष्कळच जास्त असते. एक पौंड वाळूचे तापमान एक अंशापर्यंत वाढविण्यास जितकी उष्णता लागते त्यापेक्षा पाच पटीने जास्त उष्णता एक पौंड पाण्याचे तापमान एक अंशापर्यंत वाढविण्यास लागते.

- भूमीच्या मानाने पाण्याच्या पृष्ठभागावर पडणारी सूर्याची किरणे जास्त खोलीपर्यंत जाऊ शकतात. भू-पृष्ठापासून सुमारे एक मीटर खोलीनंतर भूमीच्या भागात दैनिक तपामानांत पडणारा फरक आढळत नाही. याउलट असा फरक जलाशयाच्या भागात पृष्ठभागापासून १८ मीटर खोलीपर्यंत देखील आढळतो.
 
- पाणी हे गतिशील असते. त्यात सारख्या हालचाली होत असतात. परंतु भूमीवर या प्रकारच्या हालचाली होत नाहीत. भूमी या दृष्टीने नेहमी स्थिर असते. त्यामुळे जलाशयावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमधील उष्णता सर्व भागात पसरविली जाते.
 
- सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयावर बाष्पीभवनाची क्रिया सतत घडत असते; त्यामुळे बरीचशी उष्णता या क्रियेत नाहीशी होते. परंतु या प्रकारची क्रिया भूमीवर बहुधा फारच थोड्या प्रमाणात घडते.
 
- पाण्याच्या पृष्ठभागावर पडणारी बरीचशी उष्णता प्रवर्तित होते व पाण्याचे तापमान वाढविण्यास तिचा मुळीच उपयोग होत नाही. भूमीवर या प्रकारची क्रिया बहुधा घडत नाही.

वातावरणातील हवेचे प्रवाह, घनीभवनाची अनुद्भूत उष्णता, हवेचे आकुंचन व प्रसारण, अभ्राच्छादित आकाश, पृष्ठभागाच्या विविधतेचा परिणाम.

Wednesday, January 28, 2015

लोकसंख्येविषयक धोरण Lōkasaṅkhyēviṣayaka dhōraṇa

अर्थव्यवस्थेचा व लोकसंख्येचा अनन्यसाधारण संबंध आहे. वाढत्या लोकसंख्येवर योग्य नियंत्रण ठेवले न गेल्यास होणारा विकास आणि साधनसंपत्तीतील वाढ ही वाढती लोकसंख्या खाऊन टाकते व विकासाची फळे दृष्टोत्पत्तीस येऊ शकत नाहीत, हे लक्षात घेता लोकसंख्याविषयक सुयोग्य व प्रभावी धोरणाची निकड स्पष्ट होते. ही निकड लक्षात घेऊन देशात पहिल्या पचवार्षिक योजनेच्या कालावधीपासूनच कुटुंबनियोजन कार्यक्रमवार भर देण्यात आला. सन १९५२ पासून देशात शासकीय स्तरावर कुटुंबनोयाजन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली गेली. सुरुवातीच्या काळात या कार्यक्रमाची अंमलबजावणी अतिशय धिम्या गतीने झाली. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये या कार्यक्रमासाठी अनुक्रमे फक्त रुपये ६५ लाख, रुपये ५ कोटी व रुपये २५ कोटी इतकीच तरतूद करण्यात आली होती.

Monday, January 26, 2015

MPSC Sample Question Paper 80

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
१) १९५७        २) १९५८       ३) १९६१      ४) १९६२

२) खालीलपैकी कोणती संस्था त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीमधील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गणता येणार नाही?
१) ग्रामपंचायत       २) नगरपरिषद      ३) जिल्हा परिषद       ४) पंचायत समिती

३) बलवंतराव मेहता समितीने _______ शिफारस केली होती.
१) लोकशाहीच्या केंद्रीकरणाची    २) लोकशाहीच्या केंद्रीकरणाची    ३) अध्यक्षीय राज्यपद्धतीची    ४) धर्मनिरपेक्ष राष्ट्राची

४) _______ या अधिकाऱ्याचे ग्रामपंचायत सचिवावर नजीकचे नियंत्रण असते.
१) गटविकास अधिकारी    २) जिल्हाधिकारी      ३) मुख्य कार्यकारी अधिकारी     ४) तहसीलदार

५) खालीलपैकी कोणते काम ग्रामपंचायतीच्या आवश्यक अथवा नेहमीच्या कामात मोडत नाही?
१) रस्ते-सुधारणा     २) दिवाबत्ती     ३) सांडपाण्याची व्यवस्था     ४) शिक्षण

६) गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण _______ यांचे असते.
१) मुख्य कार्यकारी अधिकारी   २) जिल्हाधिकारी    ३) गटविकास अधिकारी वर्ग-१      ४) तहसीलदार

७) जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि महिला व बालकल्याण या समित्यांवर प्रत्येकी ______ सदस्य असतात.
१) ६      २) ८      ३) १०      ४) १२

८) पंचायत समितीस विकासाच्या योजना व अन्य कामांसाठी कोणाकडून अनुदान अदा केले जाते?
१) राज्य शासनाकडून    २) जिल्हा परिषदेकडून   ३) विभागीय आयुक्तांकडून     ४) यांपेक्षा वेगळे उत्तर

९) पंचायत समितीस आपल्या सभांचा संक्षिप्त कार्यवृत्तान्त दर _________ महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो.
१) तीन      २) चार      ३) सहा     ४) बारा

१०) जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील बाबींकरिता जिल्हा परिषदेने खर्चाची योग्य ती तरतूद करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत

समिती अधिनियम कलम _______ मध्ये स्पष्ट केले आहे.
१) ९५       २) ९७        ३) १००        ४) १०५

११) जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पध्दतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात?
१) ७ व १५     २) ४० व ५०      ३) ५० व ७५     ४) ३५ व ५०

१२) केंद्रीय स्तरावर नेमल्या गेलेल्या समित्यांमधील खालीलपैकी कोणती समिती पंचायतराज वा लोकशाही विकेंद्रीकरण या विषयाशी संबंधित नव्हती?
१) के. संथानम समिती, १९६३     २) जी.व्ही.के. राव समिती, १९८५     ३) सप्तर्षी समिती, २००२    ४) एल. एम. सिंघवी समिती, १९८६

१३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
२) जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
३) ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत.
४) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समित्तीचे पदसिद्ध सचिव असतात.

१४) _______ या राज्यांनी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील जिल्हा परिषद या सत्रास सर्वाधिक महत्त्व दिले आहे.
१) आंध्र प्रदेश व राजस्थान    २) राजस्थान व मध्य प्रदेश    ३) पश्चिम बंगाल व केरळ    ४) महाराष्ट्र व गुजरात

१५) पंचायतराज व्यवस्थेचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत अधिक अचूकरीत्या करता येईल?
१) स्थानिक शासनव्यवस्था    २) स्थानिक स्वयंशासन    ३) स्थानिक प्रशासन     ४) ग्रामीण स्थानिक स्वयंप्रशासन

१६) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी केव्हापासून लागू करण्यात आला?
१) १ जून, १९५८      २) १ जून, १९५९     ३) १ मे, १९५८     ४) १ मे, १९५९

१७) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ________ सभासद असतात.
१) ७      २) ९      ३) ११       ४) १५

१८) ग्रामसभेच्या दोन सभांदरम्यान ______ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटू देण्यास ग्रामपंचायत अधिनियमान्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
१) ६       २) ४      ३) ३      ४) २

१९) तालुक्यामधून अथवा गटामधून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्यांना पंचायत समितीवरही आपोआप प्रतिनिधित्व मिळते, हे विधान ___
१) चूक आहे.    २) अंशतः बरोबर आहे.    ३) बरोबर आहे.     ४) सुयोग्य आहे.

२०) ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त _______ सभासद असतात.
१) १७     २) २१      ३) १५       ४) २५

उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) १    ५) ४     ६) १     ७) २     ८) २     ९) ३     १०) ३
११) ३   १२) ३    १३) ४    १४) ४    १५) ४     १६) २    १७) १     १८) ३     १९) १    २०) १