Thursday, February 19, 2015

MPSC Sample Question Paper 82

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) उत्पन्न-करात सूट देऊन तो पैसा बचतीकडे वळविणे हा किंमतवाढीस आळा घालण्याचा एक उपाय होऊ शकतो; असे म्हणणे ......
१) चूक आहे     २) अर्थशास्त्रास
economics धरून नाही     ३) व्यवहार्य नाही     ४) बरोबर आहे

२) खालीलपैकी कशाचा निर्देश किंमतवाढीस आळा घालण्याचा एक उपाय म्हणून करता येणार नाही?
१) बँकदर वाढविणे  २) शासकीय खर्चात वाढ करणे  ३) बचतीस उत्तेजन देणे   ४) अर्थव्यवस्थेतील तूट कमी करणे

३) चक्रवर्ती समितीने चलनफुगवटा हेच भाववाढीचे एकमेव कारण आहे; असे सांगताना त्यास जबाबदार घटक म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाचा निर्देश केला आहे?
१) कृषिउत्पन्नातील चढ-उतार    २) जागतिक भाववाढीचे भारतातील आगमन    ३) रिझर्व्ह बँकेचे शिथिल धोरण    ४) चलनधोरणाचा अभाव
१) १ व २        २) १ व ३       ३) ३ व ४        ४) १ व ४

४) किंमत निर्देशांकाचे प्राथमिक
the primary index value, इंधन आणि उत्पादित माल हे जे तीन किंमतगट आहेत, त्यांपैकी कोणत्या गटाची किंमत वाढल्याने सर्वसामान्य किमतीही वाढल्या जातात, असा अनुभव आहे?
१) प्राथमिक     २) इंधन      ३) उत्पादित     ४) यापेक्षा वेगळे उत्तर     

५) दुहेरी किमतीची पद्धती भारतात खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या बाबतीत सर्वप्रथम स्वीकारली गेली?
१) साखर       २) सिमेंट       ३) पोलाद         ४) तांदूळ

६) ...... हा भारतात सामान्यतः मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेला किंमत निर्देशांक होय.
१) घाऊक किंमत निर्देशांक     २) प्रागतिक किंमत निर्देशांक      ३) सुवर्ण किंमत निर्देशांक
index     ४) प्राथमिक वस्तू निर्देशांक

७) कमीत कमी किती कालावधीकरता घाऊक किंमत निर्देशांक काढण्यात येतो?
१) पंधरवडा       २) ३ आठवडे      ३) एक आठवडा       ४) महिना

८) पुढीलपैकी कोणता एक उपाय किंमतवाढ नियंत्रणासाठीचा राजकोषीय
fiscal उपाय नाही?
१) सार्वजनिक खर्चात कपात करणे.     २) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर वाढविणे.     ३) सार्वजनिक कर्जाची परतफेड करणे.     ४) वैधानिक रोखता गुणोत्तर वाढवणे.

९) किंमत निर्देशांक हे एक साधन असून ते किमतीमधील _______ मापन करण्यासाठी वापरले जाते.
१) अर्थशास्त्रीय वाढीचे      २) सांख्यिकीय बदलांचे      ३) भूमितीय घटीचे      ४) व्यावहारिक स्थिरतेचे

१०) दीर्घकाळाचा विचार करता किंमत नियंत्रणाची खालीलपैकी कोणती पद्धती सयुक्तिक
meta ठरेल?
१) तुटीचे अंदाजपत्रक    २) शिलकी अंदाजपत्रक      ३) बँकदर कमी करणे       ४) उत्पादनवाढ

११) प्रामुख्याने पैशाच्या विनिमय कार्यावर भर देणारा पैशाचा प्रकार खालीलपैकी कोणता?
१) M1           २) M2        ३) M3       ४) M4

१२) जेव्हा वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ होते त्या वेळी पैशाचे _______
१) मूल्य वाढते    २) मूल्य त्याच प्रमाणात राहते.     ३) मूल्य कमी होते.   ४) मूल्य स्थिरच असते.

१३) खालीलपैकी कशाचा किंमतवाढ रोखण्याचा एक मार्ग म्हणून निर्देश करता येणार नाही?
१) अंदाजपत्रकीय तुटीत वाढ करणे.     २) काही काळ नोकरभरती बंद ठेवणे.     ३) सक्तीची बचत योजना जाती करणे.   ४) जीवनावश्यक वस्तूंची आयात करणे.

१४) खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या बाबतीत शासनाने दुहेरी किमतीचे धोरण बहुतांशी यशस्वीरित्या अवलंबिले आहे?
१) मीठ       २) पेट्रोल       ३) कापड        ४) साखर

१५) खालीलपैकी कोणत्या कारणाचा मागणीअंतर्गत किंमतवाढीच्या कारणांमध्ये समावेश करता येणार नाही?
१) चलनपुरवठ्यात वाढ   २) काळ्या पैशांत वाढ  ३) तुटीचा अर्थभरणा  ४) मूलभूत उद्योगांचा अपुरा विकास

१६) खालीलपैकी कशाचा उल्लेख किंमतवाढीचे कारण म्हणून करता येणार नाही?
१) तुटीची अर्थव्यवस्था  २) अतिरिक्त लोकसंख्यावाढ  ३) चैनीच्या महाग वस्तूंची आयात ४) बँकदरातील वाढ

१७) खालीलपैकी कोण भारतातील अन्नधान्याचा शिलकी साठा व तत्सम बाबींशी संबंधित आहे?
१) फूड कॉपेरिशन ऑफ इंडिया  २) अॅगमार्क    ३) कृषी किंमत आयोग    ४) आयएसआय

१८) भारतात अन्नधान्याचा किमान शिलकी साठा किती असणे योग्य मानले जाते?
१) १६.८ कोटी टन    २) १.६८ कोटी टन      ३) १६.८ लाख टन      ४) १६८ दशलक्ष टन

१९) पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे खर्च-दाब निर्मित चलनवाढीची
inflation स्थिती निर्माण होत नाही?
१) कामगारांना त्यांच्या उत्पादनापेक्षा जादा वेतन दिले जाणे.   २) उत्पादन घटकांच्या किमतीत वाढ होणे.    ३) अप्रत्यक्ष करांचे दर वाढणे.  ४) तुटीचा अर्थभरणा

२०) खालीलपैकी कशाचा उल्लेख भाववाढीचे
price rise एक वैशिष्ट्य म्हणून करता येणार नाही?
१) किंमतपातळीत सातत्याने वाढ  २) अतिरिक्त प्रमाणात पैशाचा पुरवठा   ३) पतपैशाचा विस्तार ४) अपुरे कृषी उत्पादन


उत्तर :
१) ४    २) २     ३) १     ४) २    ५) ३     ६) १     ७) ३     ८) ४     ९) १     १०) ४
११) १   १२) ३    १३) १    १४) ४    १५) ४     १६) ४    १७) १     १८) २     १९) ४    २०) ४

No comments:

Post a Comment