Wednesday, October 29, 2014

MPSC Sample Question Paper 75

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न

१) अश्मयुगातील मानवी अवजारे कोणती?
१) कुऱ्हाडी, चाकू    २) भाला, धनुष्य     ३) हातकुऱ्हाडी, तासण्या    ४) भाला, बाण

२) प्राचीन मानवाचा एकमेकांशेजारी घरे बांधून राहण्याचा उद्देश कोणता?
१) प्रेम वाढण्यासाठी    २) लक्ष देण्यासाठी     ३) संरक्षण       ४) शेतीसाठी

३) भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती अस्तित्वात आली?
१) सिंधु      २) गंगा     ३) यमुना     ४) गोदावरी

४) कशाच्या शोधामुळे मानवी प्रगतीला वेग आला?
१) चाक     २) अग्नी     ३) सिंधु      ४) दगडी हत्यारे

५) खालीलपैकी कोणते धान्य द्विदल आहे?
१) ज्वारी     २) मका     ३) मसूर      ४) तांदुळ

६) कोणत्या यागानंतर शेती हा मानवाचा प्रमुख व्यवसाय झाला?
१) अश्मयुग     २) नवाश्मयुग    ३) पुराश्मयुग     ४) आधुनिक युग

७) शेती करण्यासाठी कशाचा वापर केला जात असे?
१) मानव     २) अग्नी     ३) हत्यार    ४) पशू

८) अश्मयुगाचे कोणकोणते दोन प्रकार पडतात?
१) पुराश्मयुग, नवाश्मयुग     २) नवाश्मयुग, अश्मयुग     ३) अश्मयुग, पुराश्मयुग     ४) कलयुग, पुराणयुग

९) आफ्रिका खंडातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली?
१) तैग्रिस      २) युफ्रेटिस     ३) सिंधू       ४) नाईल

१०) नगरे कोणत्या ठिकाणी उभारली जात असत?
१) शहरांमध्ये     २) खेड्यांमध्ये     ३) व्यापाराच्या ठिकाणी     ४) व्यापाराच्या सोईच्या ठिकाणी

११) हडप्पा संस्कृती ही किती वर्षांपूर्वीची संस्कृती आहे?
१) ३०००     २) ५०००     ३) ४९९९     ४) ५००१

१२) नगरातील रस्त्यांची उपाययोजना कशाप्रकारे केली होती?
१) समांतर     २) छेदत होते      ३) काटकोन होते      ४) काटकोनात छेदत होते

१३) कोणत्या ठिकाणी प्रशस्त स्नानगृह सापडले आहे?
१) पंजाब     २) मोहेंजोदडो     ३) गुजरात     ४) लोथल

१४) पुन्हा पुन्हा नष्ट झालेल्या घरांचे किती अवशेष एकावर एक आढळले आहेत?
१) आठ     २) पाच      ३) सात      ४) तीन

१५) महास्नानगृहाचे पुढील पैकी योग्य माप कोणते?
१) १२ मी लांब ७ मी रुंद २.५ मी खोल        २) ७ मी लांब १२ मी रुंद २.५ मी खोल
३) १२ मी लांब २.७ मी रुंद ७ मी खोल        ४) २.५ मी लांब ७ मी रुंद १२ मी खोल

१६) सततच्या येणाऱ्या पुरांबाबत घरांसाठी कोणती उपाययोजना होती?
१) घरे नदीपासून लांब होती          २) घरे साधी व हलकी होती
३) घरे एकमेकांपासून लांब होती       ४) घरे उंच जोत्यावर बांधलेली होती

१७) आयताकृती विभागात घरांची संख्या किती असे.
१) वीस ते तीस     २) पंचवीस ते तीस      ३) तीस ते पस्तीस     ४) वीस ते पंचवीस

१८) नगरांभोवती संरक्षणासाठी कोणती उपाययोजना केलेली होती?
१) बुरुज     २) खंदक      ३) मोठीभिंत     ४) यार्याय दोन व तीन

१९) हडप्पा संस्कृती कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात वसल्याचे आढळते?
१) गंगा     २) यमुना     ३) बृह्यपुत्र     ४) रावी व सिंधु

२०) अवशेष मिळालेली ठिकाणे कोठे होती?
१) व्यापाराच्या ठिकाणी     २) नदीमध्ये    ३) नद्यांच्या खोऱ्यात     ४) शहरात

उत्तर :
१) ३    २) ३     ३) १     ४) १     ५) ३     ६) २     ७) ४     ८) १     ९) ४     १०) ४
११) २   १२) ४    १३) २    १४) ३    १५) १     १६) ४    १७) २     १८) ३     १९) ४    २०) ३

Tuesday, October 28, 2014

MPSC Sample Question Paper 74

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) ईसवी सन १११ व इसवी सन ११ यात किती वर्षांचे अंतर आहे?
१) १०० वर्षे     २) १२२ वर्षे     ३) १०१ वर्षे     ४) ११ वर्षे

२) इसवी हा शब्द कसा तयार झाला?
१) ख्रिस्तांवरून   २) ईसावरून   ३) सनावरून      ४) यापैकी नाही

३) जेम्स वॅट याने _______ चा शोध लावला.
१) विद्युत शक्तीचा    २) पाण्याच्या शक्तीचा    ३) यांत्रिक शक्तीचा     ४) वाफेच्या शक्तीचा

४) मानवाने त्याच्या आसपासच्या परिसरातील साधन संपत्तीचा उपयोग करुन कोणत्या गोष्टी मिळविल्या?
१) अन्न, वस्त्र व आरोग्य    २) अन्न, निवारा व संपत्ती    ३) अन्न, निवारा व वस्त्र     ४) अन्न, वस्त्र व पैसा

५) कोणत्या काळातील घटनांची माहिती म्हणजे इतिहास होय?
१) वर्तमान काळ     २) भूतकाळ     ३) सामान्यकाळ     ४) भविष्यकाळ

६) इसवी सन १ ते इसवी सन १०० या कालखंडास इसवी सनाचे _______ म्हणतात.
१) शतक     २) कालगणना     ३) पहिले शतक     ४) साल

७) घटनांचा कालक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याची जी पद्धत वापरतात तिला ______ म्हणतात.
१) कालगणना      २) जनगणना    ३) इसवी सन     ४) सन

८) ख्रिस्तजन्मानंतर घडलेल्या घटनेचा उल्लेख कसा करतात?
१) ख्रिस्त जन्मपूर्व    २) इसवी सनपूर्व    ३) इसवी सन    ४) सन

९) इसवी सन १९४२ साली _______ ही ऐतिहासिक घटना घडली.
१) महावीरांचा जन्म     २) भारत स्वतंत्र झाला    ३) छोडो भारत आंदोलन    ४) हडप्पा संस्कृतीचा शोध

१०) वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सनाच्या ______ वर्षे अगोदर झाला.
१) ५९८ वर्षे     २) १०० वर्षे     ३) ५८७ वर्षे     ४) ५९९ वर्षे

११) लेखनासाठी वापरण्यात येणारा रंग कोणत्या घटकापासून तयार केला जात असे?
१) रसायन      २) काजळी     ३) वनस्पती      ४) ताडपत्रे

१२) कोणत्या साधनांमध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादीचा समावेश होतो?
१) मौखिक साधने २) लिखित साधने ३) भौतिक साधने ४) प्राचीन साधने

१३) तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख म्हणजे काय?
१) शिलालेख     २) ताम्रपट       ३) नाणी        ४) ताडपत्रे 

१४) खलीलपैकी कोणत्या मिश्रणातून शाई तयार होत असे?
१) डिंक, काजळी व पाणी २) पाणी, निळ व वनस्पती ३) डिंक, पाणी व बोरू ४) डिंक, काजळी व निळ

१५) खालीलपैकी भौतिक साधने कोणती?
१) नाणी, मुद्रा, इमारतीचे अवशेष २) नाटक, गोष्ट, रामायण ३) महाभारत, शिलालेख, लोखंड ४) शिलालेख, ताम्रपट, पपायरस

१६) उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या शस्त्राला काय म्हणतात?
१) शास्त्रशुद्ध पद्धत २) प्राचीन विद्या  ३) पुरातत्व विद्या  ४) ऐतेहासिक साधने

१७) जमिनीमध्ये गाडलेले गेलेले अवशेष बाहेर काढण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात?
१) शास्त्रशुद्ध     २) पारंपरिक     ३) यांत्रिक        ४) यापैकी नाही

१८) मानव भूतकाळात वापरत असलेल्या वौतू सद्य सापडतात, त्या वस्तूंना काय म्हणतात?
१) इतिहासाची साधने २) लिखित साधने ३) ऐतेहासिक अवशेष ४) ताम्रपट

१९) कोणत्या घटकामुळे भारतच्या प्राचीन इतिहासाचा पुरावा मिळतो?
१) साहित्य     २) साधने      ३) नाणी          ४) ताम्रपट

२०) इतिहासातील विविध घटनांवरती शास्त्रीय विषयावरील लिखित साहित्याला काय म्हणतात?
१) मौखिक साधने २) लिखित साधने ३) भौतिक साधने ४) साधने

उत्तर :
१) १    २) २     ३) ४     ४) ३     ५) २     ६) ३     ७) ३     ८) ३     ९) ३     १०) ४
११) ३   १२) ३    १३) २    १४) १    १५) १     १६) ३    १७) १     १८) १     १९) ३    २०) १

Monday, October 27, 2014

शास्त्रीय शोध व संशोधक (classical research and modifiers)

महत्त्वाचे शास्त्रीय शोध व संशोधक
शोध संशोधक शोध
क्षयाचे जंतू रॉबर्ट कॉक मलेरियाचे जंतू
जीवनसत्त्वे फूंक पोलिओ लस
अनुवंशिकता जॉन मेंडेल उत्क्रांतिवाद
पेनिसिलीन फ्लेमिंग इन्शुलिन
क्ष-किरणे रोईंग्टन ऑक्सिजन (प्राणवायू) 
नायट्रोजन डॅनियल रुदरफोर्ड क्लोरोफॉर्म
वैश्विक किरण होमी भाभा टाईपरायटर
लेसर किरण चार्ल्स टोन्स तारायंत्र
दूरदर्शन जे. एच. बेअर्ड लिफ्ट (उद्वाहक)
इलेक्ट्रॉनिक संगणक एखार्ट मॉचली चलत चित्र
वायूभार मापक टॉरिचेली थर्ममिटर
रडार टेलर-यंग रेडिओ
विमान राईट बंधू रेफ्रिजरेटर
विद्युत दिवा एडिसन ग्रामोफोन
किरणोत्सारिता हेन्री बेकेरेल आगबोट
डिझेल इंजिन रुडाँल्फ डिझेल शॉर्टहँड
सापेक्षता विध्दांत E=Mc2 आईनस्टाईन सिंथेटिक जीन
अंधासाठी ब्रेललिपी लुईस ब्रेल भूमिती
रोनाल्ड रॉस देवी लस एडवर्ड जेन्नर
साल्क घटसर्प फ्रेडरीक लोफ्लर
डार्विन अँटी रेबीज लुई पाश्चर
फ्रेडरिक बेंटिंग होमिओपॅथी हायेनमान
प्रिस्टले कार्बन डायॉक्साईड रॉन हेलमाँड
सिम्पसन-हॅरिसन फॉस्फरस ब्रँड
शोल्स स्टेथॅस्कोप लायनेक
सॅम्युअल मोर्स टेलिफोन अलेक्झांडर बेल
ओटीस संगणक व्हॅन बुश, शॉल्स
एडिसन विद्युत जनित्र मायकेल फॅरेडे
गॅलिलिओ रिव्हॉल्व्हर कोल्ट
मार्कोनी वाफेचे इंजिन जेम्स वॅट
पार्किन्स हेलिकॉप्टर सिकोर्स्कि
एडिसन सेफ्टी लँप हंप्रे डेव्ही
फुल्टन न्यूमॅटिक टायर जॉन डनलॉंप
पिटमन गुरुत्वाकर्षण न्यूटन
डॉ. हरगोविंद खुराना पाणबुडी जॉन हॉलंद
युक्लिड भूखंडवहन सिद्धांत आल्फ्रेड वेगनर

Saturday, October 25, 2014

MPSC Sample Question Paper 73

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014नमुना प्रश्न

१) महाराष्ट्रातील औरंगाबाद या प्रशासकीय विभागातून _________ हा राज्यातील सातवा प्रशासकीय विभाग निर्माण करण्याची घोषणा वादग्रस्त ठरली आहे.
१) लातूर     २) नांदेड     ३) परभणी     ४) सोलापूर

२) महाराष्ट्रात ________ या जिल्हात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.
१) चंद्रपूर      २) गडचिरोली      ३) सिंधुदुर्ग      ४) यवतमाळ

३) कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील _________ या ठिकाणी झाला आहे.
१) महाबळेश्वर     २) कोयना     ३) अजिंक्यतारा    ४) प्रतापगड

४) अनिवासी (परदेशस्थ) भारतीयांना राज्यातील अविकसित भागात उद्योगधंदे स्थापण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने १९६६ मध्ये ________ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
१) MIDC     २) MSSIDC     ३) MSFC   ४)  SICOM

५) महाराष्ट्रात ________ या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो.
१) आंबोली     २) महाबळेश्वर      ३) कोयना     ४) वाई

६) _________ जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात.
१) रायगड    २) सिंधुदुर्ग     ३) यवतमाळ    ४) नांदेड

७) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवर _________ हे धरण आहे.
१) ताडोबा     २) गडमौसी    ३) कसरला    ४) असोलमेंढा

८) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे?
१) १५८'  उत्तर ते २२१' उत्तर अक्षांश     २) १५८' पूर्व ते २२१' पूर्व अक्षांश
३) ७२६' पूर्व ते ८०९' पूर्व अक्षांश      ४) ७२६' उत्तर ते ८०९' उत्तर अक्षांश

९) खालील मुद्दे शक्याशक्यता ओळखा.
अ) महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार सर्वाधिक आहे.
ब) पूर्व-पश्चिम विस्ताराच्या तुलनेत महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार अधिक आहे.
१) मुद्दा अ बरोबर, ब चूक    २) मुद्दा ब बरोबर, अ चूक   ३) दोन्ही मुद्दे बरोबर    ४) दोन्ही मुद्दे चूक  

१०) महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने ______ या जिल्ह्यात आहेत.
१) नागपूर     २) ठाणे     ३) चंद्रपूर     ४) भंडारा

११) मगरींसाठी प्रसिध्द असलेले 'ताडोबा राष्ट्रीय उद्यान' चंद्रपूर जिल्ह्यातील ________ तालुक्यात आहे.
१) भद्रावती   २) सावली   ३) बल्लारपूर    ४) जिवती

१२) महाराष्ट्रात हिमरू शालींचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते?
१) नागपूर      २) सोलापूर     ३) औरंगाबाद     ४) नाशिक

१३) मार्च २०१० अखेर महाराष्ट्रात प्रत्येक धारकामागे धारणाक्षेत्राची टक्केवारी _______ हेक्टर इतकी आहे.
१) ५.०     २) ३.३२     ३) २.२१     ४) १.६५

१४) महाराष्ट्रात भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ________ डोंगररांगांमुळे वेगळी झाली आहेत.
१) सातमाळा-अजिंठा    २) महादेव    ३) हरिश्चंद्र-बालाघाट      ४) सातपुडा

१५) _______ या जिल्ह्याच्या नैॠत्येस चंदूरगडचे डोंगर आहेत.
१) चंद्रपूर       २) गडचिरोली    ३) भंडारा     ४) गोंदिया

१६) महाराष्ट्रातील २३ वी महानगरपालिका कोणती?
१) धुळे     २) नंदूरबार    ३) ठाणे      ४) वसई-विरार

१७) ________ या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रंगांना 'तोरणमाळचे पठार' म्हणतात.
१) गडचिरोली    २) चंद्रपूर    ३) धुळे     ४) नंदूरबार

१८) १२ जुलै १९६१ रोजी पुण्यातील ______ हे धरण फुटून मोठी हानी झाली होती.
१) पानशेत    २) आर्वी    ३) तानसा    ४) कामशेत

१९) भारतातील ______ या राज्याच्या विभाजनातून 'तेलंगणा' हे नवे राज्य निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.
१) आंध्र प्रदेश     २) तामिळनाडू     ३) ओडिशा     ४) त्रिपुरा

२०) कावरती ही खालीलपैकी कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?
१) दमण-दीव    २) दादरा-नगरहवेली    ३) पुदुच्चेरी     ४) लक्षव्दीप

उत्तर :
१) २    २) १     ३) १     ४) ४     ५) १     ६) ३     ७) ४     ८) १     ९) १     १०) ३     
११) १    १२) ३     १३) ४     १४) २     १५) १     १६) ४    १७) ४     १८) १     १९) १    २०) ४

Friday, October 17, 2014

दृष्टिदोष Vision

दृष्टिदोष प्रामुख्याने नेत्रभिंग व दृष्टिपटल यामधील अंतरावर अवलंबून असतात. नेत्रगोलाच्या आकारानुसार हे अंतर ठरते. यामध्ये बिघाड झाल्यास दृष्टिदोष उद्भवतात.

निकटदृष्टित (मायोपिया) Myopia:

नेत्रभिंग फुगीर होण्यामुळे किंवा नेत्रगोल लांबट होण्यामुळे हा दोष उदभवतो. त्यामुळे नेत्रभिंग दृष्टिपटल यामधील अंतर वाढते.
स्वरूप : दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर न पडता ती दृष्टिपटल व नेत्रभिंग यांच्यामध्ये पडते.
परिणाम : हा दोष असणाऱ्या व्यक्तीस जवळचे स्पष्ट दिसते; मात्र दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.
उपाय : अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून निकटदृष्टिता हा दोष दूर करता येतो.

दूरदृष्टिता (हायपरमेट्रोपिया) Hayprmetropia :
नेत्रगोल उभट होण्यामुळे किंवा नेत्रभिंग किंचित चपटे होण्यामुळे हा दोष उदभवतो. त्यामुळे नेत्रभिंग व दृष्टिपटल यामधील अंतर कमी होते.
स्वरूप : दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते, तर जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे तयार होते.
परिणाम : या दोषामुळे 'दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, मात्र जवळचे स्पष्ट दिसत नाही.'
उपाय : बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून हा दोष निवारता येतो.

वृध्ददृष्टिता (प्रिसबायोपिया) Prisbayopia :

वयोमानानुसार (शक्यतो चाळीशीनंतर) नेत्रभिंग मोठे होते आणि सामायोजी स्नायू दुर्बल होऊन समायोजन शक्ती कमी होते व हा दोष उदभवतो.
स्वरूप : निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो. यास वृध्ददृष्टिता म्हणतात.
परिमाण : वृध्ददृष्टिता दोषात जवळचे स्पष्ट दिसत नाही.
(जसे जसे वय होते तसे नजरेचा निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो. त्यामुळे सुईत धागा ओवणे, धान्य निवडणे, वाचन या गोष्टी सहज जमत नाहीत)

अबिंदूकता (दृष्टीवैषम्य) Drishtivasmy :
पारपटलाचा आकार गोलाकार राहत नाही. त्यामुळे नेत्र गोलचा व्यास विविध दिशांना वेगवेगळा असतो.
परिणामी एकाच प्रतलातील क्षीतिज समांतर रेषा व क्षीतिज लंब रेषा यांच्या प्रतिमा भिन्न प्रतलात तयार होतात. यास अबिंदुकता म्हणतात.
उपाय : दंडगोल भिंगाचा चष्मा वापरून अबिंदूकता निवारता येतो.

मोतीबिंदू (कॅटॅरॅक्ट) Katarakt :

वयानुसार डोळ्यातील प्रथिनांचे रंग बदलल्याने नेत्रभिंग धुसर आणि अपारदर्शक होते व मोतीबिंदू उदभवतो.
परिणाम : दृष्टी अंधुक होते किंवा कधीकधी पूर्ण दिसेनासे होते.
उपाय : ऑपरेशनने मोतीबिंदू दूर करता येतो.
(मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यानंतरदेखील कधीकधी मोतीबिंदू पुन्हा उदभवतो. हा दुसऱ्यांदा उद्भवलेला मोतीबिंदू 'लेसर उपचार पद्धतीने' दूर करता येतो.)

Monday, October 13, 2014

MPSC Sample Question Paper 72

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते?
१) विकरे     २) आम्ले     ३) पिष्टमय पदार्थ     ४) जीवनसत्वे

२) मानवी त्वचेतील अभिचर्माच्या सर्वांत खालच्या स्तरास कोणते नामाभिधान आहे?
१) अधोचार्म स्तर     २) मृतपेशिस्तर      ३) माल्फीधिस्तर      ४) यापैकी नाही

३) _______ मुळे त्वचेला विशिष्ट वर्ण प्राप्त होतो.
१) वर्णकपेशी      २) स्वेदरंध्रे     ३) दोन्ही बरोबर       ४) यापैकी नाही

४) कृमिसम मध्यभाग हा मेंदूच्या कोणत्या भागाशी निगडित आहे?
१) प्रमस्तिष्क     २) अनुमस्तिष्क    ३) मस्तिष्कस्तंभ     ४) यापैकी नाही

५) दृष्टीपटलाच्या खालीलपैकी कोणत्या भागात संवेदी पेशींच्या अभावी पदार्थाची प्रतिमा तयार होत नाही?
१) पीतबिंदू     २) अंधबिंदू    ३) काचबिंदू     ४) मोतिबिंदू

६) दृष्टीपटलाच्या _______ या बिंदूतून दृष्टीचेता नेत्रगोलाच्या मागील बाजूने बाहेर पडते
१) अंधाबिंदू     २) पीतबिंदू     ३) बाहुली     ४) कॉर्निया

७) दृष्टीपटलातील ______ या पेशींमुळे आपणास रंगदृष्टी लाभते.
१) शंकूपेशी     २) दंडपेशी      ३) चेतापेशी     ४) यापैकी नाही

८) ऑक्सिझन्स ही वनस्पतींच्या _______ साठी उपयुक्त संप्रेरके आहेत.
१) वाढीसाठी      २) वाढ रोखण्यासाठी     ३) वनस्पतींचा नाश करण्यासाठी    ४) यापैकी नाही

९) प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे प्रकाश विघटन होते या संशोधनाचे जनकत्व कोणास द्यावयास हवे?
१) रॉबर्ट हिल       २) रॉबर्ट हूक      ३) श्लायडन       ४) लिवेनहूक

१०) प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साईडचे सात्मीकरण होऊन शर्करानिर्मितीच्या आधी ______ हा उपपदार्थ तयार होतो?
१) अॅसेटिक अॅसिड     २) फॉस्फोग्लिसरिक आम्ल    २) सल्फ्युरिक आम्ल    ४) यापैकी नाही

११) स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगर हॅन्समधील _________ या पेशींमधून इन्शुलिन हे संप्रेरक स्त्रवते.
१) अल्फा     २) बीटा      ३) गॅमा     ४) कायिक

१२) पर्यावरण आणि सजीव यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास जीवशास्त्राच्या खालीलपैकी कोणत्या उपशाखेत केला जातो?
१) परिस्थितीकी      २) परिसंस्था     ३) रुपिकी     ४) पर्यावरणशास्त्र

१३) असमपृष्ठरज्जू (अपृष्ठवंशीय) प्राण्यांच्या गटात एकूण किती प्रसृष्टींचा समावेश होतो?
१) १०      २) ११     ३) १३     ४) अगणित

१४) सोल-जेल सिद्धांतानुसार अमिबामध्ये _______ ची निर्मिती होते.
१) छद्मपाद     २) केंद्रक      ३) रिक्तिका      ४) यापैकी नाही

१५) जलव्यालामध्ये (हायड्रा) प्रचलनासाठी _________ हे अवयव असतात.
१) शुंडके       २) छद्मपाद     ३) नलिकापाद      ४) पाय

१६) कृत्रिम ऑक्झिन्स या संप्रेरकांच्या गटात खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थांचा समावेश करता येणार नाही?
१) इंडाल अॅसेटिक अॅसिड (IAA) २) २-४-D  ३) नॅप्थॅलिन अॅसेटिक अॅसिड (NAA)  ४) बेंझॉईक अॅसिड

१७) तंतुभवन (Fibrosis) हा श्वसनरोग खालीलपैकी कोणत्या अवयवास जडतो?
१) जठर    २) लघुआंत्र     ३) फुफ्फुसे     ४) छाती

१८) मीठ, साखर व पाणी यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणास _________ असे म्हणतात.
१) साखरसंजीवनी     २) मीठसंजीवनी    ३) जलसंजीवनी    ४) पिष्टमय

१९) 'इंटरल्यूकिन' हे प्रथिन उत्पादित ________ उपयुक्त ठरले आहे.
१) कर्करोगावर   २) हत्तीरोगावर     ३) साईनफ्लुरोगावर    ४) फ्लुओरिनरोगावर

२०) डाऊनच्या रोगात रुग्णांच्या गुणसुत्ररचनेत एकूण ______ गुणसूत्रे असतात.
१) ५०      २) ४७     ३) ४८      ४) ४१

उत्तर :
१) १    २) ३     ३) १     ४) २     ५) २     ६) १     ७) १     ८) १     ९) १     १०) २     
११) २    १२) १     १३) १     १४) १     १५) १     १६) १    १७) ३     १८) ३     १९) १    २०) २

Saturday, October 4, 2014

MPSC Sample Question Paper 71

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होत नाही?
१) गोवा       २) दादरा, नगर हवेली     ३) दीव व दमण     ४) लक्षव्दिप

२) खालीलपैकी कोणत्या गृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो?
१) लोकसभा     २) राज्यसभा      ३) विधानसभा     ४) विधानपरिषद

३) भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्विकारण्यात आले?
१) २६ जानेवारी १९३०    २) १५ ऑगस्ट १९४७    ३) २६ नोव्हेंबर १९४९    ४) २६ जानेवारी १९५०

४) खालील विधानांची शक्याशक्यता पडताळून योग्य पर्याय निवडा.
विधान (अ) : पंतप्रधानपदाचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो.
विधान (ब) : घटनेने पंतप्रधानपदाचा निश्चित कार्यकाल स्पष्ट देलेला नाही. मात्र लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकतात.
१) विधान 'अ' बरोबर, 'ब' चूक               २) विधान 'अ' चूक 'ब' बरोबर
३) दोन्ही विधाने बरोबर आहेत               ४) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली?
१) ९ डिसेंबर १९४६     २) ११ डिसेंबर १९४६    ३) २९ ऑगस्ट १९४७     ४) २२ जानेवारी १९४८

६) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो?
१) उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश    २) राज्यपाल     ३) राष्ट्रपती    ४) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

७) भारतीय घटनेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
१) स्वरूप पाहता भारतीय राज्यघटनेत संघराज्यात्मक व एकात्मक अशी दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात.
२) भारतीय राज्यघटना अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ आहे.
३) केंद्रसत्ता प्रबळ असलेले संघराज्यात्मक राष्ट्र असे भरतांचे वर्णन करता येईल.
४) भारतीय राज्यघटनेने अध्यक्षीय राज्यपद्धतीस अधिक महत्त्व दिले आहे.

८) राज्यपालांसंदर्भात खालील विधानांची शक्याशक्यता पडताळून अचूक पर्याय निवडा.
विधान अ) राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक नामधारी प्रमुख आहे.
विधान ब) आणीबाणी काळात (कलम ३५६) मात्र राज्यपाल घटक राज्यांच्या कारभारात निर्णायक भूमिका बजावू शकतो.
पर्याय : १) फक्त विधान 'अ' बरोबर        २) विधान 'ब' बरोबर   
       ३) दोन्ही विधाने बरोबर आहेत    ४) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

९) स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते?
१) उपराष्ट्रपती       २) सभापती     ३) पंतप्रधान     ४) परराष्ट्र मंत्री

१०) 'राज्यसभेच्या सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती हा सभापतींचे काम पाहतो. म्हणजेच अशावेळी उपसभापती हा उपराष्ट्रपती होतो' हे विधान.
१) पूर्णतः खरे आहे     २) अंशतः खरे आहे   ३) संदिग्घ आहे    ४) पूर्णतः चुकीचे आहे.

११) घटनासमितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) मोहम्मद सादुल्ला     २) मौलाना आझाद     ३) बॅ. जीना     ४) अलादी कृष्णस्वामी अय्यर

१२) कलम १२३ नुसार राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात. यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?
१) संसदेचे अधिवेशन चालू असतानाच राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
२) एखाद्या गंभीर प्रसंगी वटहुकूम काढणे अनिवार्य झाल्यास संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
३) या वटहुकूमास सहा आठवड्यांच्या आत संसदेच्या नजिकच्या अधिवेशनात तो मांडून त्यास संसदेची मंजुरी घ्यावीच लागते.
४) सहा आठवड्यांच्या आत मंजुरी न मिळाल्यास हा वटहुकूम रद्दबातल ठरतो.

१३) अर्थविषयक विधेयकाच्या (धन विधेयक) बाबतीत खालील विधानांचा अभ्यास करून त्याखालील योग्य पर्याय ओळखा.
अ) धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते.
ब) धनविधेयक प्रथम राज्यसभेतच मांडावे लागते.
क) धनविधेयक प्रथम लोकसभा वा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते.
ड) धनविधेयक मंजुरीसाठी कोणत्याही सभागृहात मांडण्याची आवश्यकता नाही.
१) फक्त 'अ' बरोबर    २) फक्त 'ब' बरोबर     ३) फक्त 'ड' बरोबर    ४) सर्व बरोबर

१४) भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास (तिरंगा) कधी संमती दिली?
१) १५ ऑगस्ट १९४७     २) २२ जुलै १९४७     ३) २६ नोव्हेंबर १९४९    ४) २२ जानेवारी १९४८

१५) भारतीय घटना समिती (जुलै १९४६) मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशींनुसार अंमलात आली?
१) क्रिप्स योजना     २) माउंट बॅटन योजना     ३) त्रिमंत्री योजना      ४) राजाजी योजना

१६) भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम प्रजासत्ताक (गणराज्य) कधी बनले?
१) १५ ऑगस्ट १९४७    २) २६ नोव्हेंबर १९४९    ३) २६ जानेवारी १९५०    ४) यापैकी नाही

१७) घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणत्या व्यक्तीचा निर्देश करता येईल?
१) बी. एन. राव     २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     ३) डॉ. राजेंद्र प्रसाद     ४) पं. नेहरू

१८) भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     २) डॉ. राजेंद्र प्रसाद     ३) पं. नेहरू    ४) सच्चिदानंद सिन्हा

१९) भारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला?
१) १५ ऑगस्ट १९४७    २) २६ नोव्हेंबर १९४९    ३) २६ जानेवारी १९५०     ४) यापैकी नाही

२०) राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते?
१) राज्याचा प्रतिनिधी    २) केंद्राचा प्रतिनिधी      ३) जनतेचा प्रतिनिधी    ४) राष्ट्रपतींचा प्रतिनिधी

उत्तर :
१) ४    २) २     ३) ३     ४) २     ५) ३     ६) ३     ७) ४     ८) ३     ९) ३     १०) ४     
११) ३    १२) १     १३) १     १४) २     १५) ३     १६) ३    १७) १     १८) ४     १९) २    २०) ४