Saturday, July 19, 2014

MPSC Sample Question Paper 48

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न
१) भारतीय राज्यघटना इंग्लंडच्या घटनेप्रमाणे सहज ______ नाही, तसेच ती अमेरिकेच्या घटनेप्रमाणे अति _____ ही नाही.
१) परिवर्तनीय, परिदृढ   २) परिदृढ, परिवर्तनीय    ३) ताठर, लवचिक    ४) यापैकी नाही

२) कोणत्या ठरावानुसार घटनासमिती सार्वभौम झाली?
१) १४ ऑगस्ट १९४७    २) १५ ऑगस्ट १९४७    ३) २२ जुलै १९४७    ४) २६ जानेवारी १९५०

३) सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची _________ होय.
१) अनुक्रमणिका     २) प्रस्तावना     ३) पुरवणी     ४) मूळ प्रत

४) मुलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या (संपत्तीच्या) हक्काशी कोणते कलम संबंधित होते?
१) कलम ३१      २) कलम ३२      ३) कलम ३५      ४) यापैकी नाही

५) घटनेच्या आठव्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
१) २१ वी      २) ३१ वी      ३) ७१ वी      ४) ८१ वी

६) राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठीच्या महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे?
१) कलम १६१    २) कलम ६१     ३) कलम १२४     ४) कलम ७२

७) भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य मानता येणार नाही?
१) अनुकरणप्रियता    २) १९३५ च्या कायद्याचा लार्वाधिक प्रभाव   ३) अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ   ४) अध्यक्षीय शासनप्रणालीचा स्वकार

८) भारतीय राज्यघटनेने आयरिश घटनेवरून मार्गदर्शक तत्वांची कल्पना स्वीकारलेली आहे तर मुलभूत हक्कांची संकल्पना _______ या देशांच्या घटनेवरून स्वीकारली आहे?
१) अमेरिका      २) फ्रान्स      ३) 'अ' व 'ब' दोन्ही     ४) यापैकी नाही

९) भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१) समाजवादी     २) धर्मनिरपेक्ष    ३) गणराज्य      ४) साम्यवादी

१०) संघसूचीत १००, राज्यसूचीत ६१ तर समवर्ती सूचित ______ विषयांचा समावेश आहे.
१) ५२     २) ६२     ३) ७२     ४) ८२

११) घटनेने उर्वरित विषयांवरील शेषाधिकार कोणास बहाल केले आहेत?
१) सर्वोच्च न्यायालय    २) संसद     ३) राज्यशासन     ४) उच्च न्यायालय

१२) घटकराज्यात पेचप्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती ______ कलमानुसार राज्यात घटनात्मक आणीबाणी जाहीर करतात.
१) कलम ३५२     २) कलम ३५६     ३) कलम ३६०      ४) यापैकी नाही

१३) वैधानिक विकास मंडळे स्थापण्यासंबंधी कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे?
१) कलम ३६८     २) कलम ३७१      ३) कलम ३७०     ४) सर्व बरोबर

१४) राज्यात विधानपरिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कलम १६९ नुसार कोणास आहे?
१) संबंधित विधानसभा     २) लोकसभा     ३) राष्ट्रपती    ४) सर्वोच्च न्यायालय

१५) भारताच्या राष्ट्रपतींसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य अथवा गैरलागू आहे?
१) राष्ट्रपती हा भारताचा नामधारी घटनात्मक प्रमुख आहे.
२) राष्ट्रपती हा सरसेनापती (Supreme Commander) असतो, मात्र त्यास लष्करी अधिकार वापरताना मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागते.
३) पंतप्रधान व त्याच्या मंत्रिंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो.
४) सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादेखील राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो.

१६) कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात, परंतु तो त्यांच्यावर बंधनकारक नसतो.
१) कलम १२३     २) कलम १२४     ३) कलम १४३     ४) कलम ३४३

१७) राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
१) विधानसभा      २) लोकसभा     ३) राज्यसभा      ४) विधानपरिषद

१८) महाभियोगची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?
१) कलम ६१     २) कलम ६२     ३) कलम १४३     ४) कलम ३६८

१९) पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे?
१) पहिले     २) पंधरावे      ३) नववे      ४) दहावे

२०) कलम २८० नुसार राष्ट्रपती पाच वर्षांसाठी वित्त आयोग नेमतात. वित्त विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?
१) कलम १०९     २) कलम ११०    ३) कलम २८१     ४) कलम २८०

उत्तर :
१) १     २) १     ३) २     ४) १     ५) १     ६) २     ७) ४     ८) ३     ९) ४      १०) १     
११) २    १२) २     १३) २     १४) १     १५) ४    १६) ३    १७) ४     १८) १     १९) ३    २०) २

No comments:

Post a Comment