Saturday, November 29, 2014

क्षारांविषयी माहिती (salt information)

इंग्रजी नाव व्यावहारिक नाव मराठी नाव उपयोग
फेरस सल्फेट ग्रीन व्हिट्रिऑल हिराकस शाई व रंग उत्पादनासाठी
मॅग्नेशियम सल्फेट इप्सम सॉल्ट - औषधांमध्ये रेचक म्हणून कापड उदोगात रंगबंधक म्हणून
कॉपर सल्फेट क्ल्यू व्हिट्रिऑल मोरचूद जंतूनाशक, कवकनाशक, तांबे शुद्धीकरणात, डॅनिअलच्या विद्युत घटात द्रावण म्हणून
अमोनियम सल्फेट - - खत उद्योगात
पोटॅशिअम नायट्रेट नायटर किंवा बेंगॉल सॉल्ट पीटर सोरा बंदुकीची दारू, शोभेची दारू, खत उद्योगात
मॅग्नेशियम कार्बोनेत फ्रेंच चॉक - औषधात आम्ल प्रतिबंधक म्हणून सौंदर्यप्रसाधने, टुथपेस्टमध्ये
झिंक सल्फेट व्हाईट व्हिट्रिऑल - डोळ्यात घालवायचे औषध लिथोफोन हा पांढरा रंग निर्मिती
झिंक ऑक्साईड झिंक सफेदा - पांढरा रंग निर्मिती, रबर उद्योग, मलम निर्मिती
सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा - साबण, धुण्याचा सोडा, कागद उद्योगात पेट्रोलियम शुध्दीकारणात
पोटॅशियम अल्युमिनीअम सल्फेट - तुरटी जलशुध्दीकरण, कातडी उद्योग, कागद उद्योग रक्तस्त्राव रोखण्यासाठी पोटॅश तुरटीचा उपयोग
सिल्व्हर नायट्रेट लुनार कॉस्टिक - शाई, कलप निर्मिती, चांदीचे विद्युत विलेपन थर्मासमधील विलेपन
मर्क्युरस क्लोराईड Hg2Cl2 कॉलोमेल - औषधांमध्ये रेचक म्हणून विद्युत इलेक्ट्रोडमध्ये (कॅलोमेल)
मर्क्युरिक क्लोराईड - - जंतुनाशक, नेसलरचा अभिक्रियाकारक निर्मितीत. लाकडाचे वाळवीपासून संरक्षण.
अमोनियम क्लोरीड साल अमोनिअक - लेक्लांशेच्या विद्युत घटात
अमोनियम नायट्रेट - - गोठण मिश्रणात, खत उद्योगात
अमोनियम कार्बोनेट - - बेकिंग पावडर, कापड उद्योगात.
सिल्व्हर ब्रीमाईड - - छायाचित्रण उद्योगात
पोटॅशियम परमँगनेट - - जलशुद्धीकरणात जंतूनाशक
फॉस्फरस पेंटॉक्साईड - - निर्जलक म्हणून
लेड मोनॉक्साईड लिथार्ज शेंदूर काच आणि रंग उद्योगात
पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक पोटॅश - खत उद्योगात
कॅल्शियम सल्फेट जिप्सम - प्रयोगशाळांतून
मिथेन (CH4)  मार्श गॅस - ज्वलन
कार्बोनिल क्लोराईड फोस्जिन (Cocl2) - युद्धांमध्ये विषारी वायू
सोडियम सिलीकेट - जलकाच साबण उद्योगात भरण द्रव्य
फ्लिंट काच - प्रकाशीय काच प्रकाशीय उपकरणे, कृत्रिम हिरे बनवण्यासाठी

Tuesday, November 25, 2014

MPSC Sample Question Paper 78

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न

१) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता?
१) पंडित जवाहरलाल नेहरू    २) बॅ. महमदअली जीना   ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    ४) डॉ. सच्चिदानंद फिन्हा

२) भारतीय घटनेनुसार _________ सर्वभौस आहे.
१) संसद      २) भारतीय जनता    ३) न्यायसंस्था     ४) कार्यकारी मंडळ

३) "घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे." हे विधान......
१) संपूर्णत: चूक आहे.    २) पूर्णतः बरोबर आहे.   ३) विपर्यस्त आहे.     ४) संदिग्ध स्वरूपाचे आहे.

४) "घटनेतील कलम 'कलम ५१ ए' अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते." हे विधान......
१) संपूर्णतः चुकीचे आहे.   २) पूर्णतः बरोबर आहे.     ३) वस्तुस्थितीशी सुसंगत आहे.   ४) अंशतः बरोबर आहे.

५) घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
१) लोकसभा      २) कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा     ३) लोकसभा व राज्यसभा     ४) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा

६) भारतीय घटनेतील सर्वाधिक दुरुस्त्या ______ या कलमाशी संबंधित आहेत.
१) कलम १३      २) कलम १९     ३) कलम ३६८     ४) कलम ३५२

७) खालीलपैकी कोणत्या कलमान्वये आपल्या स्वतःच्याच निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यालायास आहे?
१) कलम १३७    २) कलम १७३      ३) कलम १४२     ४) कलम १७४

८) ______ या संघराज्य प्रदेशात व्दिस्तरीय पंचायतराज पद्धती अस्तित्वात आहे.
१) पुदुच्चेरी     २) दादरा व नगर-हवेली     ३) दिल्ली     ४) चंडिगढ

९) भारतीय संघराज्यात नवीन राज्य सामील करून घेण्याचा, नवीन राज्य प्रस्थापित करण्याचा अथवा राज्यपुनर्रचनेचा अधिकार संसदेस आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये हा अधिकार संसदेस प्राप्त झाला आहे?
१) दुसऱ्या      २) तिसऱ्या       ३) चौथ्या      ४) पाचव्या

१०) ________ म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
१) घटनेचा मसुदा     २) मार्गदर्शक तत्त्वे      ३) घटनेचा सरनामा      ४) लिखित घटना

११) खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींस नाहीत?
१) अॅटर्नी जनरल     २) कम्प्ट्रोलर अँड      ३) राज्यपाल       ४) उपराष्ट्रपती

१२) आर्टिकल ______ हे राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे.
१) १२३     २) ३६८      ३) ३५२     ४) ३७०

१३) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१) दर दोन वर्षांनी राज्यसभेतील एक-तृतीयांश सभासद निवृत्त होतात.
२) दर पाच वर्षांनी राज्यसभेवर नवीन सदस्य निवडून जातात.
३) राज्यसभेचे सभासद हे कायमचे सभासद असतात.
४) राज्यसभेवर सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताचे नागरिक नसले तरी चालते.

१४) साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त ______ इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात.
१) ९       २) १२      ३) २२     ४) ७८

१५) खालीलपैकी कोणती बाब राज्य शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे?
१) शेतजमिनीवरील वारसाकर   २) रेल्वेचे उत्पन्न     ३) कस्टम ड्युटी     ४) पोस्ट खात्याचे उत्पन्न

१६) खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही?
१) राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे    २) राष्ट्रगीताचा मान राखणे     ३) मतदानाचा हक्क बजावणे     ४) सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे

१७) भारताच्या लोकसभेमध्ये गणसंख्या गणसंख्या पुरी होण्यास किती टक्के सभासद उपस्थित असणे आवश्यक आहे?
१) २५ टक्के     २) १० टक्के      ३) २० टक्के       ४) ३३ टक्के

१८) भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील _______ हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.
१) घटनेचा सरनामा    २) मार्गदर्शक तत्त्वे      ३) मूलभूत कर्तव्ये     ४) मूलभूत हक्क

१९) राष्ट्रपतींनी मागविलेली माहिती त्यांना देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये (Article) नमूद केले आहे?
१) ७८      २) ७४      ३) ७५     ४) ७६

२०) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त ______ इतका काळ स्थानबध्द करता येते.
१) तीन महिने     २) एक वर्ष    ३) दोन वर्षे    ४) सहा महिने

उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) १    ५) ४     ६) १     ७) १     ८) २     ९) १     १०) ३
११) ४   १२) १    १३) १    १४) २    १५) १     १६) ३    १७) २     १८) १     १९) १    २०) १

Sunday, November 23, 2014

कामगारांच्या हिताचे विविध कायदे Kāmagārān̄cyā hitācē vividha kāyadē

१) १८८१ चा पहिला फॅक्टरी अॅक्ट
- १०० पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या गिरणींना हा कायदा लागू.
- ७ ते १२ वयोगटातील मुलांना कामगार म्हणून भरती करू नये.
- मुलांना ९ तासांपेक्षा जास्तकाळ काम देऊ नये.
२) १८९२ चा दुसरा फॅक्टरी अॅक्ट
मेजर लेथब्रिज आयोगाच्या शिफारशींनुसार संमत करण्यात आलेल्या या कायद्यातील तरतुदी -
- ५० हून अधिक कामगार चार महिन्यांहून अधिक काळ काम करतात ती जागा फॅक्टरी समजावी.
- स्त्रियांसाठी कामाचे तास ११ असावेत.
- रविवारी सुट्टी असावी.
३) १९११ चाफॅक्टरी अॅक्ट
स्मिथ आयोगानुसार रचना -
- मुलांचे कामाचे तास ६, तर पुरुषांचे कामाचे तास १२
- स्त्रियांना रात्रपाळीस बंदी.
४) १९३८ चा बालमजुरी कायदा
- रेल्वे व गोदीत १५ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवण्यास कायद्याने बंदी.
- आगपेटी व्यवसायात १२ वर्षांखालील बालकामगारांना बंदी.
५) १९४८ चा फॅक्टरी अॅक्ट
भारत सरकारच्या या कायद्यातील तरतुदी
- हा कायदा १० पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या कारखान्यांना लागू.
- यंत्रे नसलेल्या कारखान्यात कामगारांची कमाल संख्या २० असावी.
- कामाचे रोजचे ८ तास म्हणजेच आठवड्याचे २० असावी.
- १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी.
- स्त्रियांचे कामाचे ८ तास, संध्याकाळी ७ नंतर कामावर ठेवण्यास बंदी.
- ५०० हून अधिक कामगारांच्या कारखान्यात एक कामगार कल्याण अधिकारी असावा.
६) १९४८ चा किमान वेतन कायदा
१३ असंघटित उद्योगांसाठी निश्चित केलेल्या या कायद्यानुसार कामगारांचे वेतन ठरविण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारांना देण्यात आला.
- १९८२ मध्ये कापड गिरणी कामगारांनी दीर्घकाळ संप केल्याने सरकारने १३ गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९८५ मध्ये नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले.

Thursday, November 13, 2014

MPSC Sample Question Paper 77

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
१) लोकसभा सदस्य    २) राज्यसभा सदस्य    ३) विधानसभा सदस्य      ४) विधानपरिषद सदस्य

२) फक्त घटनाभंगाच्या कृतीबद्दल राष्ट्रपतींना महाअभियोग प्रक्रियेव्दारे पदावरून दूर करता येते. या महाअभियोग प्रक्रियेशी _______ संबंधित असते / असतात.
१) फक्त लोकसभा  २) फक्त राज्यसभा  ३) संसदेची दोन्ही गृहे ४) संसद व घटक राज्यांची विधिमंडळे

३) राज्यसभेने अर्थविषयक विधेयक दुरुस्तीसह वा दुरुस्तीविरहित १४ दिवसांच्या मुदतीत लोकसभेकडे सादर न केल्यास ______
१) ते नामंजूर झाले असे समजण्यात येईल.  २) ते जसेच्या तसे दोन्ही गृहांनी संमत केले असे समजण्यात येईल.  ३) ते पुन्हा नव्याने मांडावे लागेल.    ४) त्यावर दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घ्यावा लागेल.

४) भारताचे कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल केंद्र शासनाच्या लेख्यांसंदर्भातील आपला अहवाल खालीलपैकी कोणाकडे सादर करतात?
१) अर्थमंत्री       २) संसद      ३) राष्ट्रपती      ४) अर्थ आयोग

५) ______ घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक, मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
१) सव्विसाव्या      २) बेचाळिसाव्या      ३) चव्वेचाळिसाव्या     ४) शहात्तराव्या

६) भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे?
१) तीन वेळा       २) एकदाही नाही     ३) साठ वेळा      ४) फक्त एकदाच

७) एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो?
१) राष्ट्रपती      २) लोकसभा सभापती      ३) लोकसभा      ४) राज्यसभा

८) _____ या देशात न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संकल्पनेचा सर्वाधिक विकास झाला आहे.
१) अमेरिका      २) ब्रिटन      ३) चीन       ४) फ्रान्स

९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत?
१) ३५२, ३५६, ३६०      २) १६३, १६४, १६५     ३) ३६७, ३६८, ३६९    ४) ३६९, ३७०, ३७१

१०) खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात?
१) १२०      २) १२३      ३) १४०      ४) १४३

११) 'रिट ऑफ हॅबिअस कॉर्पस' व 'रिट ऑफ मँडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत?
१) संपत्तीचा हक्क  २) स्वातंत्र्याचा हक्क  ३) धर्मस्वातंत्र्याचा हक्क ४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क

१२) कितव्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाल हा सहा वर्षांचा करण्यात आला होता?
१) ४२ व्या      २) ४३ व्या     ३) ४४ व्या      ४) ४५ व्या

१३) एकतिसावी घटनादुरुस्ती, १९७३ अनुसार लोकसभेत जास्तीत जास्त _______ इतके सदस्य असतात.
१) २८८      २) ७८       ३) ५२५      ४) ५४५

१४) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) राष्ट्रपती     २) सरन्यायाधीश     ३) उपराष्ट्रपती      ४) पंतप्रधान

१५) आणीबाणीच्या काळात संसद _______ पर्यंत विधानसभेचा कार्यकाल वाढवू शकते.
१) १ वर्ष       २) २ वर्षे      ३) ५ वर्षे      ४) ६ महिने

१६) संसदेस एखाद्या राज्याचा प्रदेश कमी-अधिक करण्याचा, राज्यांच्या सीमारेषा बदलण्याचा तसेच राज्याचे नावही बदलण्याचा अधिकार आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये संसदेस हा अधिकार प्राप्त झाला आहे?
१) तिसऱ्या      २) तीनशे सतराव्या     ३) तीनशे अडुसष्टाव्या      ४) दहाव्या

१७) सातव्या परिशिष्टातील तीनही सूचींमध्ये दिलेल्या विशयांव्यतिरिक्त उर्वरित विषयांवर कायदे करण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) संसदेस  २) संबंधित घटक राज्यास  ३) संसदेस व घटक राज्यास   ४) यांपैकी कोणासही नाहीत

१८) सन १९७१ मध्ये संमत झालेला 'अंतर्गत सुरक्षा कायदा' (MISA) खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आला?
१) १९७३        २) १९७७      ३) १९७८      ४) १९७९

१९) खालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट नाही?
१) उर्दू      २) सिंधी      ३) मणिपुरी      ४) नागा

२०) अ) केंद्रीय सेवेतील जे अधिकारी राज्याच्या कक्षेत सेवा करतात त्यांचे वेतन व भत्ते संबंधित   
          राज्याच्या निधीमधून दिले जातात, तथापि
    ब) त्यांच्या बदल्या, बढत्या व सेवाशर्ती या बाबी केंद्र शासनाच्या अखत्यारीतच असतात.
१) दोन्ही विधाने बरोबर आहेत.    २) फक्त पहिले विधान बरोबर आहे.    
३) फक्त दुसरे विधान बरोबर आहे.   ४) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

उत्तर :
१) ४    २) ३     ३) २     ४) ३    ५) २     ६) २     ७) २     ८) १     ९) १     १०) ४
११) ४   १२) १    १३) ४    १४) १    १५) १     १६) १    १७) १     १८) ३     १९) ४    २०) ४

Sunday, November 9, 2014

विद्युत रोध आणि ओहमचा नियम (Vidyuta rōdha āṇi ōhamacā niyama)

Oham
विद्युत रोध आणि ओहमचा नियम

विद्युत रोध : वाहन तारेतील मुक्त इलेक्ट्रॉन्स यादृच्छिक गतीने संचार करत असताना मार्गातील अणूंवर आदळतात व त्यांची गती कमी होते.
- मुक्त संचारी इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहात हा जो अडथळा निर्माण होतो, त्या अडथळ्यात विद्युत रोध म्हणतात.
- विद्युत रोधामुळे वाहक तारेची गतिज ऊर्जा कमी होते व औष्मिक ऊर्जा (Awshmic Energy) वाढून तार तापते.
- विद्युत रोधाचे एकक : ओहम (oham)

ओहम (aoham) : वाहकाच्या दोन टोकांमध्ये एक व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता, वाहकातून एक अॅम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध एक ओहम असतो.
- विशिष्ट तापमानास वाहक तारेचा रोध खालील बाबींवर अवलंबून असतो.
१) वाहक द्रव्य  २) वाहकाची लांबी, व  ३) वाहकाच्या काटछेदाचे क्षेत्रफळ
उदा. वाहकाची लांबी जितकी जास्त, तितका त्याचा रोध अधिक.

- वाहकाच्या काटछेदाचे क्षेत्रफळ वाढल्यास रोध कमी होतो.
- सुवाहाकाचा रोध कमी असतो, तर विसंवाहकाचा रोध जास्त असतो.

विशिष्ट रोध : कोणत्याही द्रव्याचा विशिष्ट रोध म्हणजे त्या द्रव्यापासून बनविलेल्या एकक लांबी व एकक काटछेदाचे क्षेत्रफळ असलेल्या तारेचा रोध होय.

ओहमचा नियम : (विभवांतर व विद्युतधारा (current) यांचा परस्पर संबंध)
"जर वाहकाची भौतिक अवस्था कायम राहत असेल, तर वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर आणि वाहकातून जाणारी विद्युतधारा यांचे गुणोत्तर स्थिर राहते."

V / I = R; येथे       
    V = विभवांतर, (Potential difference)
    I = विद्युतधारा (current)
    R = वाहकाचा रोध (स्थिराक)
- विभवांतर व विद्युतधारा यामधील स्थिरांकास (R) वाहकाचा रोध असे म्हणतात.
- वाहकाच्या मिती, द्रव्य व तापमान कायम असते, तोपर्यंत वाहकाची भौतिक अवस्था कायम असते.

ओहामीय वाहक
: तांबे, चांदी, अॅल्युमिनियम या वाहकांच्या आधारे, ओहामच्या नियमाची पडताळणी करता येते, म्हणून त्यांना ओहमीय वाहक असे म्हणतात.

अनओहमीय वाहक : ओहमच्या नियमाचे पालन न करणारे वाहक उदा. डायोड, थर्मिस्टर हे अनओहमीय वाहक आहेत.
१) डायोडमध्ये एका दिशेने विद्युतधारा जात असेल तर रोध कमी असतो. मात्र, विजेरी संचाची ध्रुवता बदलल्यास रोध वाढतो. या गुणधर्मामुळे डायोडचा वापर 'दिष्टकारी' (Rectifier) या उपकरणात करतात.
२) थर्मिस्टरमध्ये वाढत्या तापमानानुसार रोध (Obstacle) कमी होतो.
३) थर्मिस्टरचा वापर तापमान मोजण्यासाठी व तापमान नियंत्रण परिपथामध्ये केला जातो.

Monday, November 3, 2014

बुद्धिमत्ता २ (budhdimtta)


MPSC Sample Question Paper 76

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

सर्वनामाचा प्रकार सांगा


१) माझा
१) पुरुष वाचक     २) आत्मवाचक      ३) दर्शकवाचक     ४) सामान्य

२) ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाभळी -
१) संबंधी सर्वनाम     २) दर्शक सर्वनाम    ३) प्रश्नार्थक सर्वनाम     ४) आत्मवाचक सर्वनाम

३) आपण हे काम करणार नाही
१) पुरुषवाचक      २) आत्मवाचक     ३) दर्शकसर्वनाम      ४) प्रश्नार्थक

४) बाहेर कोण अंधार पडला आहे.
१) प्रश्नार्थक     २) सामान्य     ३) आत्मवाचक      ४) संबंधी

५) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले?
१) प्रश्नार्थक     २) सामान्य     ३) आत्मवाचक     ४) पुरुषवाचक

विशेषणाचा प्रकार ओळखा

६) सातारी पेढी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.
१) नामसाधित      २) धातूसाधित      ३) अव्यय साधित    ४) गुणवाचक

७) आज रडक्या मुलाला घेण्याची फार गरज आहे.
१) धातूसाधित      ३) अव्यय साधित     ३) नामसाधित      ४) धातूसाधित

८) जेवण झाल्यावर त्याने खूप विश्रांती घेतली.
१) निश्चित संख्या विशेषण     २) अनिश्चित संख्या विशेषण    ३) गुणवाचक विशेषण    ४) सार्वनामिक विशेषण

९) सुंदर दोन पाऊल पुढे आला.
१) निश्चित संख्या विशेषण     २) अनिश्चित संख्या विशेषण    ३) अव्ययसाधित विशेषण    ४) नामसाधित विशेषण

१०) दयाळू परमेश्वर आपले रक्षण करतो.
१) अधिविशेषण      २) विधि विशेषण    ३) निश्चित संख्या विशेषण     ४) अनिश्चित संख्या विशेषण

काळाचे प्रकार ओळखा

११) खालील पूर्ण वर्तमानकाळी क्रियापदाचा क्रमांक चौकटीत लिहा.
१) जातो     २) जात आहे     ३) गेला आहे    ४) जा

१२) खालील भूतकाळी क्रियापद कोणते?
१) जातो     २) जात आहे     ३) गेला आहे     ४) जा

१३) खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळ असणाऱ्या वाक्याचा क्रमांक चौकटीत लिहा.
१) झाडावर पक्षी बसला     २) शाम जेवण करीत आहे    ३) बाबा पेपर वाचत असतील     ४) आईचा स्वयंपाक झाला असेल.

१४) तो खुर्चीत बसून बोलला.
१) सकर्मक क्रियापद     २) धातूसाधित     ३) प्रायोजक      ४) शक्य क्रियापद

१५) आता मला दररोज मैल चालवते. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
१) शक्य     २) प्रयोजक    ३) सकर्मक क्रियापद    ४) संयुक्त क्रियापद

१६) प्रयोजक क्रियापद ओळखा.
१) झाड पडले     २) झाड पाडले     ३) झाड पडत आहे     ४) झाड क्रियापद

क्रियाविशेषण अव्यय
१७) मुले खाली बघून जेवण करीत होती.
१) कालवाचक       २) रीतिवाचक      ३) स्थलवाचक     ४) परिणामवाचक

१८) संथ वाहते कृष्णामाई.
१) कालवाचक     २) स्थलवाचक     ३) रीतिवाचक      ४) परिणामवाचक

१९) संध्याकाळी मी उशीरा जेवण घेणार -
१) परिमाण    २) स्थलवाचक      ३) रीतिवाचक     ४) कालवाचक

२०) तो जेवणानंतर भरपूर झोपला.
१) रीतिवाचक     २) परिमाणवाचक    ३) कालवाचक    ४) स्थलवाचक

उत्तर :
१) १    २) १     ३) २     ४) २     ५) १     ६) १     ७) १     ८) २     ९) १     १०) १
११) ३   १२) ३    १३) ३    १४) २    १५) १     १६) २    १७) ३     १८) ३     १९) ४    २०) २