Monday, September 29, 2014

मान्सून प्रदेश (मोसमी)

मान्सून किंवा मोसमी प्रदेशांना 'शेतीचा प्रदेश' म्हणूनही ओळखले जाते.
अनिश्चित स्वरूपाचा पाऊस हे मान्सून प्रदेशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

अक्षवृत्तीय विस्तार :
विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस १० ते ३० अक्षांशांदरम्यान.

समाविष्ट प्रदेश :
दक्षिण व आग्नेय आशियातील भारत, पाक, म्यानमार, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण चीन, उत्तर ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका, वेस्ट इंडिज, पूर्व आफ्रिका व मादागास्कर बेटे यांचा मान्सून प्रदेशात समावेश होतो.

हवामान :
वार्षिक सरासरी तापमान - २६ सें.ग्रे.

पर्जन्यमान : सरासरी २५० सें.मी., पर्जन्याचे असमान वितरण.
या प्रदेशात जून-सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो.


वनस्पतीजीवन :

२०० सेंमीपेक्षा अधिक पावसाच्या प्रदेशात सदाहरित वने आढळतात.
१०० ते २०० सेमी पावसाच्या प्रदेशात रुंदपर्णी वने आढळतात, तर अतिकमी पावसाच्या भागात काटेरी झुडपे व गवत आढळते.
साग, चंदन, वड, शिसव, पिंपळ, निलगिरी, सिंकोना, बांबू, बाभूळ हे वृक्षप्रकार आढळतात. सागाच्या वनात सलगता दिसून येते.

पिके :
शेती हा मान्सून प्रदेशातील पूर्वापार व्यवसाय आहे. तांदूळ हे महत्त्वाचे पीक असल्याने मान्सून प्रदेशातील शेती 'तांदुळाची शेती' म्हणून ओळखली जाते.
ताग, कापूस, नारळ, कॉफी, तेलबिया, मसाले यांचे उत्पादनही घेतले जाते. तांदूळ हे येथील लोकांचे प्रमुख अन्न आहे. अलीकडे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे खनिज व शेतीमालावर आधारित अनेक उद्योग या प्रदेशात मूळ धरू लागले आहेत.

Thursday, September 25, 2014

MPSC Sample Question Paper 70

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) भारतात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने प्रेस कैन्सिल अॅक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
१) १९७६     २) १९७७     ३) १९७८     ४) १९८०

२) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती?
१) शिवराम वलंगकर   २) नारायण गुरू     ३) राजगुरू     ४) पेरियार

३) १९७५ च्या दरम्यान ______ या नेत्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू केले.
१) राजनारायण     २) जयप्रकाश नारायण     ३) मोरारजी देसाई     ४) यापैकी नाही

४) १८५७ च्या उठावास अनेक घटक कारणीभूत असले तरी ______ या व्हाईसरॉयचे आक्रमक विस्तारवादी धोरणच यामागे प्रामुख्याने कारणीभूत मानावयास हवे.
१) लॉर्ड बेंटिक     २) लॉर्ड वेलस्ली     ३) लॉर्ड डलहौसी     ४) लॉर्ड कॅनिंग

५) १८५७ च्या उठावाच्या अपयशाच्या कारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही?
१) क्रांतिकारकांमधील एकसुत्रतेचा व एककेंद्री नेतृत्वाचा अभाव
२) बहुसंख्य संस्थानिक व सुशिक्षित भारतीय उठावापासून अलिप्त राहिले.
३) ३१ मे या नियोजित तारखेदिवशीच उठावास सुरुवात झाली.
४) दक्षिण भारताच्या तुलनेत केवळ उत्तर भारतातच उठावाचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले.

६) खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकारणाचा जनक म्हणून ओळखले जाते?
१) लॉर्ड कॅनिंग    २) लॉर्ड लॉरेन्स     ३) लॉर्ड मेयो     ४) लॉर्ड नोर्थब्रुक

७) श्रीमंती इंदिरा गांधी यांनी २६ वी घटनादुरुस्ती करून ______ या वर्षीपासून संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला.
१) १९६८      २) १९६९     ३) १९७०     ४) १९७१

८) १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा _______ या पंतप्रधानांनी 'जय जवान जय किसान' असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते.
१) पं. जवाहरलाल नेहरू    २) लालबहाद्दूर शास्त्री   ३) इंदिरा गांधी    ४) यापैकी नाही

९)  पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कारकीर्दीत १९६४ दरम्यान 'पीएल ४-८०' योजनेनुसार (रेल्वेमंत्री स. का. पाटील यांच्या प्रयत्नाने) _________ या देशाने भारतास अन्नधान्याची मदत केली.
१) रशिया      २) अमेरिका     ३) इंग्लंड     ४) चीन

१०) १९६२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची भेट घेऊन अण्वस्त्रांच्या निर्मितीवर आंतरराष्ट्रीय बंदी आणावी, अशी मागणी कोणत्या भारतीय नेत्याने केली होती?
१) पं. जवाहरलाल नेहरू     २) डॉ. एस. राधाकृष्णन     ३) सी. राजगोपालाचारी    ४) डॉ. राजेंद्र प्रसाद

११) २५ एप्रिल १९६० च्या मुंबई प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताच्या विभाजनातून _______ व ही दोन राज्ये अस्तित्वात आली.
१) मुंबई, बडोदा      २) महाराष्ट्र, गुजरात      ३) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश    ४) मुंबई-मैसूर

१२) फाजल अली यांच्या अध्यक्षतेखालील राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार ______ या वर्षी केंद्र शासनाने भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा संमत केला.
१) १९५३       २) १९५४     ३) १९५५      ४) १९५६

१३) भारतीय संसदेने १९५५ साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर ________ या वर्षी हिंदू कायदा संमत केला.
१) १९५३     २) १९५४     ३) १९५५     ४) १९५६

१४) स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
१) मौलाना आझाद    २) जॉन मथाई     ३) अमृता कौर     ४) बलदेवसिंग

१५) लॉर्ड रिपनच्या कारकिर्दित गाजलेले १८८३ चे इलबर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते?
अ) भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार.
ब) युरोपियन न्यायाधीशांना भारतीयांवरील खटले चालविण्याचा अधिकार.
क) भारतीयांना द्यावयाच्या शिक्षणिक सुधारणा
ड) भारतीयांना द्यावयाच्या आर्थिक सुधारणा
१) फक्त अ बरोबर     २) अ आणि ब बरोबर     ३) अ, ब आणि क बरोबर    ४) सर्व बरोबर

१६) १८५७ या उठाव हे भारताचे स्वातंत्र्ययुध्द होते असे मानणाऱ्या विचारवंतांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) वि. दा. सावरकर     २) अशोक मेहता    ३) सुरेंद्रनाथ सेन    ४) प्रा. न. र. फाटक

१७) लो. टिळकांनी पुरुस्कृत केलेल्या चतु:सुत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि _____ या चार बाबींचा समावेश होता.
१) बहिष्कार     २) सत्याग्रह      ३) कायदेभंग     ४) असहकार

१८) चार्ल्स अचीसानाच्या अध्यक्षतेखाली (१८८६) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणास जाते?
१) लॉर्ड डफरिन     २) लॉर्ड हार्डिंग्ज      ३) लॉर्ड डलहौसी     ४) लॉर्ड रिपन

१९) ऑगस्ट १९०५ मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली?
१) चाफेकर बंधूंच्या फाशीचा निषेध २) बंगालच्या फाळणीस विरोध ३) अलबर्ट बिलास विरोध  ४) वरीलपैकी सर्व

२०) १९१७ ची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी ______ याच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते.
१) कार्ल मार्क्स     २) रुसो     ३) निहिलिस्त     ४) मॅक्झिम गॉर्की

उत्तर :
१) ३    २) २     ३) २     ४) ३     ५) ३     ६) ३     ७) ४     ८) २     ९) २     १०) ३     
११) २    १२) ४     १३) ४     १४) २     १५) १     १६) ४    १७) १     १८) १     १९) २    २०) १

Wednesday, September 17, 2014

MPSC Sample Question Paper 69

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) मतदानासाठी आवश्यक पात्रता वय २१ वरून १८ वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१) ६१ वी     २) ६२ वी     ३) ७१ वी     ४) ८९ वी

२) संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात ________ च्या अभिभाषणाने होते.
१) पंतप्रधान     २) राष्ट्रपती    ३) लोकसभा सभापती     ४) उपराष्ट्रपती

३) खालील विधानांचा अभ्यास करून अचूक पर्याय निवडा.
अ) पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
ब) पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ संसदेस जबाबदार असते.
१) अ आणि ब बरोबर     २) अ आणि ब चूक     ३) फक्त अ      ४) फक्त ब

४) केंद्रीय कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) राष्ट्रपती      २) पंतप्रधान     ३) गृहमंत्री    ४) सर्वोच्च न्यायालय

५) राज्यसभेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?
१) राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.
२) दर दोन वर्षांनी राज्यसभेचे १/३ सदस्य निवृत्त होतात व तितकेच नव्याने निवडले जातात.
३) उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिध्द अध्यक्ष असतो.
४) महत्त्व लक्षात घेता राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व प्रथम सभागृह आहे.

६) विधानपरिषदेसंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?
१) विधान परिषद हे राज्य विधीमंडळाचे स्थायी सभागृह आहे.
२) विधान परिषद हे विधीमंडळाचे वरिष्ठ व व्दितीय सभागृह आहे.
३) विधान परिषदेचे १/३ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.
४) विधान परिषदेचा कार्यकाल विधानसभेप्रमाणेच पाच वर्षांचा असतो.

७) आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम कोणते?
१) कलम ३५२    २) कलम ३५६     ३) कलम ३६०    ४) कलम ३७०

८) संघसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेस, राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधीमंडळास तर समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार ______ यास आहे.
१) राज्यांना     २) केंद्रशासित प्रदेशास    ३) केंद्र व राज्य दोहोंना   ४) यापेक्षा वेगळे उत्तर

९) घटनेच्या चौथ्या भागातील मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
१) कल्याणकारी राज्याची निर्मिती हा मार्गदर्शक तत्त्वांच्या उद्देश आहे.
२) मार्गदर्शक तत्त्वे ही जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा यांचे द्योतक आहेत.
३) मार्गदर्शक तत्त्वांना कायदेशीर मान्यता नसल्याने, त्यांची अंमलबजावणी केलीच पाहिजे, असा आग्रह संस्थेवर करता येत नाही.
४) मुलभूत अधिकारांसारखेच मार्गदर्शक तत्त्वांविरुध्द न्यायालयात दाद मागता येते.

१०) घटनेच्या ८ व्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
१) २१ वी     २) ६१ वी     ३) ७१ वी      ४) ८१ वी

११) कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन 'मिनी घटना' (Mini-constitution) म्हणून केले जाते?
१) ४२ वी     २) ४४ वी     ३) २६ वी     ४) ६१ वी

१२) घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कांशी संबंधित घटना कलम कोणते?
१) कलम ३१      २) कलम ३२      ३) कलम ३५      ४) कलम १२३

१३) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे?
१) कलम १४     २) कलम १५     ३) कलम १६    ४) कलम १७

१४) घटनेच्या सरनामा कोणी लिहिला आहे?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     २) पं. जवाहरलाल नेहरू    ३) पं. मोतिलाल नेहरू   ४) सरदार पटेल

१५) घटनेच्या सरनाम्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात समर्पकपणे करता येईल?
१) सरनामा ही राज्यघटनेचे तत्त्वज्ञान सांगणारी गुरुकिल्ली आहे.
२) सरनामा म्हणजे घटनेचा आत्मा व प्राण आहे.
३) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही.
४) सरनाम्याविषयी वरील सर्व विधाने खरी आहेत.

१६) स्वरूप लक्षात घेता भारतीय राज्यघटनेचे वर्णन कोणत्या शब्दात करणे योग्य होईल?
१) परिवर्तनीय, परिदृढ  २) परिदृढ, परिवर्तनीय 
३) अंशतः परिवर्तनीय, अंशतः परिदृढ  ४) यापैकी नाही  

१७) घटनासमितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) सरोजिनी नायडू    २) हंसाबेन मेहता    ३) अॅनी बेझंट    ४) राजकुमारी अमृता कौर

१८) भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष (स्थायी) कोण होते?
१) डॉ. राजेंद्र प्रसाद    २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    ३) सच्चिदानंद सिन्हा     ४) पं. नेहरू

१९) भारतीय घटनासमितीने तिच्या उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला?
१) १५ ऑगस्ट १९४७    २) २२ जानेवारी १९४७    ३) २६ जानेवारी १९५०    ४) यापैकी नाही

२०) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करते?
१) सरन्यायाधीश     २) राज्यपाल     ३) राष्ट्रपती      ४) मुख्यमंत्री

उत्तर :
१) १    २) २     ३) १     ४) ४     ५) ४     ६) ४     ७) ३     ८) ३     ९) ४     १०) ३     
११) २    १२) २     १३) ४     १४) २     १५) ४     १६) ३    १७) ३     १८) १     १९) २    २०) २

Tuesday, September 16, 2014

MPSC Sample Question Paper 68

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) खालीलपैकी कोणत्या गृहाच्या सदस्यांना त्या गृहाचा सभापती निवडण्याचा अधिकार नसतो?
१) लोकसभा    २) राज्यसभा    ३) विधानसभा    ४) यापैकी नाही

२) कोणत्या एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे?
१) दिल्ली     २) अंदमान-निकोबार    ३) नववे    ४) दहावे

३) राष्ट्रपतींना अभिभाषणासाठी कोण निमंत्रित करते?
१) महान्यायवादी    २) महाधिवक्ता    ३) महालेखापरिक्षक   ४) उपराष्ट्रपती

४) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य अथवा गैरलागू आहे?
१) केंद्रसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेस आहेत.
२) राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार घटकराज्यांना आहेत.
३) समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार केंद्र व राज्य दोहोंना आहेत.
४) घटनेने शेषाधिकार मात्र राज्य सरकारांना बहाल केले आहेत.

५) लोकसेवा आयोगांची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?
१) कलम ३१५    २) कलम ३७१     ३) कलम ३६८    ४) कलम ३७०

६) पंतप्रधानांचे वर्णन करताना खालीलपैकी कोणते प्रयोजन योग्य नाही?
१) 'मंत्रिमंडळरूपी कमानीची आधारभूत शिला'  २) 'देशाचा प्रथम नागरिक'  ३) 'ग्रहमालिकेतील सूर्य'  ४) 'समानातील पहिला'

७) केंद्रीय कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) राष्ट्रपती    २) लोकसभा    ३) राज्यसभा    ४) विधानपरिषद

८) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला?
१) ४२ व्या     २) ४४ व्या     ३) २६ व्या     ४) ६१ व्या

९) सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम १२४ नुसार करण्यात आली आहे, तर उच्च न्यायालयाची तरतूद _____ नुसार करण्यात आली आहे.
१) कलम १२३     २) कलम १२४    ३) कलम २१४      ४) कलम १४२

१०) घटनादुरुस्तीशी संबंधित कलम कोणते आहे?
१) कलम ३६८     २) कलम ३७१    ३) कलम ३७०      ४) कलम ३४३ 

११) घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू-काश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आला आहे?
१) कलम ३७०     २) कलम ३७१    ३) कलम ३६८      ४) कलम १६९

१२) राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा (क्षमादानाचा) अधिकार कोणत्या कलमानुसार बहाल करण्यात आला आहे?
१) कलम १२३ (ब)     २) कलम ७२(ब)    ३) कलम ७१(ब)      ४) यापैकी नाही 

१३) बाह्य आक्रमण, अंतर्गत बंडाळी या बाबींशी संबंधित राष्ट्रीय आणीबाणीचे कलम कोणते?
१) कलम ३५२     २) कलम ३५६    ३) कलम ३६०      ४) कलम १२३

१४) संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे?
१) पहिल्या   २) दुसऱ्या    ३) तिसऱ्या    ४) सातव्या

१५) डिसेंबर २००३ मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, संथाली, मैथिली व लडाखी या चार भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आला?
१) ९० वी घटनादुरुस्ती    २) ९१ वी घटनादुरुस्ती     ३) ९२ वी घटनादुरुस्ती   ४) ९३ वी घटनादुरुस्ती  

१६) भारतीय घटनेने भारतीयांना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व बगाल केले आहे?
१) एकेरी नागरिकत्व    २) दुहेरी नागरिकत्व   ३) नागरिक ज्या राज्यात राहतो, त्या घटकराज्याचे नागरिकत्व    ४) यापैकी नाही.

१७) घटनेने आपले उगमस्थान कोणास मानलेले आहे?
१) घटनाकारांना   २) भारतीय जनतेला   ३) मसुदा समितीच्या अध्यक्षांना   ४) यापैकी नाही

१८) आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केलेले आहे?
१) जर्मनी (वायमार प्रजासत्ताक)  २) अमेरिका   ३) कॅनडा  ४) इंग्लंड

१९) घटनादुरुस्तीची पद्धत (कलम ३६८) भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे?
१) अमेरिका    २) इंग्लंड    ३) द. आफ्रिका  ४) जर्मनी (वायमार प्रजासत्ताक)

२०) लोकलेखा समितीच्या २२ सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात?
१) ३०     २) १५    ३) २२   ४) एकही सदस्य नसतो

उत्तर :
१) २    २) १     ३) २     ४) ४     ५) १     ६) २     ७) ४     ८) १     ९) ३      १०) १     
११) १    १२) २     १३) १     १४) ४     १५) ३     १६) १    १७) २     १८) १     १९) ३    २०) २

Saturday, September 13, 2014

राज्यातील पोलिस प्रशासन Rajyatil police prashasan

१) पोलिस महासंचालक (Director General of Police) हे राज्यातील पोलिस खात्यातील सर्वोच्च पद असून ते पदोन्नतीने प्राप्त होते.
 
२) पोलिस हा राज्यांच्या अख्त्यारितील (राज्यसूचीतील) विषय असून राज्याच्या गृहमंत्रालायाच्या अख्त्यारित या विभागाचे कार्य चालते.
 
३) राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य पोलिस यंत्रणेवर आहे.
 
४) कंटक-शोधन, कंटक-निवारण व कंटक
 
५) पोलिस अधिक्षक (SP) व त्यावरील अधिकारी हे भारतीय पोलिस सेवेतील (IPS) वरिष्ठ अधिकारी असून त्यांची निवड संघ लोक संघ लोकसेवा आयोग व नेमणूक राज्य शासन करते.
 
६) पोलिस उपअधिक्षक (DySP) व सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) व नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते.
 
७) पोलिस उपनिरीक्षकांची (PSI) निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते.
 
८) पोलिस उपनिरीक्षकांची नेमणूक पोलिस मुख्यालयाकडून केली जाते.
 
९) गावपातळीवर पोलिस यंत्रणेस सहाय्य करण्यासाठी पगारी पोलिस पाटलाची नेमणूक केली जाते.
 
१०) राज्यात नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत (PTA) पोलिस उपनिरीक्षक, पोलिस उपअधिक्षक व सहाय्यक पोलिस आयिक्त या पदांसाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
 
११) तुरची (ता. तासगाव, जि. सांगली) येथे नव्याने स्थापन झालेल्या पोलिस प्रशिक्षण अकादमीत (PTA) २०११ - १२ पासून पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
 
१२) राज्यात पोलिस शिपायांसाठी (कॉन्स्टेबल्स) प्रशिक्षण केंद्रे खंडाळा, नाशिक, मरोळ (मुंबई), अकोला, नागपूर, जालना, तासगाव आदी ठिकाणी आहेत.
 
१३) भारतीय पोलिस सेवेतील (IPS) उच्चाअधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशात मसूरी येथे लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी व हैदराबाद येथे सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय अकादमी कार्यरत आहे.
 
१४) भारतात १९५५ साली सर्वप्रथम मुंबई राज्यात स्त्री-पोलिसांची नेमणूक करण्यात आली.
 
१५) राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या दशलाक्षी शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून पोलिस आयुक्ताल्यांची स्थापना करण्यात आली आहे.
 
१६) पोलिस आयुक्त हा भारतीय पोलिस सेवेतील उच्चाधिकारी पोलिस आयुक्तालयाचा प्रमुख म्हणून कार्य करतो.
-नियंत्रण या पद्धतीनी पोलिस यंत्रणा राज्यात कायदा व सुव्यवस्था राखते.

Thursday, September 11, 2014

जैव - तंत्रज्ञान Bio-Technology

वैशिष्ट्ये :
१) जैवतंत्रज्ञान हे रेणू पातळीवर आधारलेले विज्ञान आहे.
२) सजीवांमधील जैविक तत्त्वे व प्रक्रिया यांच्या वापरातून हे तंत्रज्ञान उदयास आले आहे.

मूलभूत तत्त्व :
१) जैव-तंत्रज्ञानात साजीवांमधील DNA रेणूतील जीन्स (genes) महत्त्वाची भूमिका बजावतात.
२) जनुक (जीन्स Genes) : जनुक हा DNA रेणूचा महत्त्वाचा भाग असून 'प्रथिन संश्लेषण' हे त्याचे मुख्य कार्य आहे.
३) जनुकाव्दारे सजीवांची अनुवांशिक वैशिष्ट्ये ठरविली जातात.
४) जनुकांमधील बदल सजीवांमध्ये नवीन वैशिष्ट्ये निर्माण करतो.
५) जैवतंत्रज्ञानात जनुकांच्या या गुणधर्माचा वापर करून सजीवांचे आनुवंशिक गुणधर्म बदलले जातात.

जैवतंत्रज्ञानाचे उपयोग :

१] कृषि आणि जैवतंत्रज्ञान :
भारतीय कृषि संशोधन संस्थेने जैवतंत्रज्ञानाचा वापर करून 'पुसा जयकिसान' व 'पुसा सोना' या मोहरीच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत.
या जातींमुळे मोहरीच्या बिजोत्पादनात २० टक्के व तेल उत्पादनात ४० टक्के वाढ झालेली आहे.

२] नव्या रासायनिक तणनाशकांचा विकास :
१) जैवतंत्रज्ञानाधारे रासायनिक तणनाशक प्रतिबंधक वनस्पती विकसित केल्या गेल्या आहेत.
२) 'ब्रोमोक्झिनिल', 'ग्लायफॉस्फेट' यासारखी रासायनिक तणनाशके मुख्य पिकाला धोका न पोहोचवता केवळ तणांचाच नाश करतात.
३) कापूस , भूईमूग इत्यादी पिकांच्या जनुकांमध्ये बदल करून अधिक उत्पादन देणारे नवीन वाण निर्माण केले गेले आहेत.

३] आरोग्य आणि जैवतंत्रज्ञान :
१) रोगनिदानात जनुकांची भूमिका निश्चित करता येते.
२) मधुमेह व हृदयविकार यांचे निदान शक्य झाले आहे.
३) मूल गर्भाशयात असतानाच त्याच्यातील जनुकीय दोषांचा मागोवा घेणे शक्य झाले आहे.

Wednesday, September 10, 2014

MPSC Sample Question Paper 67

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) भारतात बंगळुरू खालोखाल आंध्र प्रदेशातील ________ हे शहर देशातील इलेक्ट्रॉनिकी उद्योगाच्या केंद्रीकरणाचे दुसरे मोठे शहर बनलेले आहे.
१) हैदराबाद     २) विशाखापट्टणम     ३) मछलीपट्टण     ४) काकीनाडा

२) २०११ मध्ये ______ हा देशातील ३८ वा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे.
१) परंबीकुलम     २) ताडोबा      ३) इटांगकी     ४) कुर्ग

३) 'दक्षिण गंगोत्री' (१९८४) व 'मैत्री' (१९८९) यांच्यानंतर अंटार्क्टिका खंडावर विकसित होत असलेला भारताचा तिसरा संशोधन तळ कोणता?
१) मैत्रेयी      २) जम्नोत्री      ३) भारती      ४) गार्गी

४) दक्षिण-मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
१) चैन्नई     २) सिकंदराबाद     ३) हुबळी       ४) गोरखपूर

५) राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ (NH-7) कोणत्या दोन शहरांना जोडतो?
१) दिल्ली-मुंबई      २) चैन्नई-मुंबई     ३) पुणे-विजयवाडा     ४) वाराणसी-कन्याकुमारी

६) भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा केंद्र ______ या राज्यातील मधपूर या ठिकाणी आहे.
१) तामिळनाडू     २) हिमाचल प्रदेश    ३) गुजरात     ४) महाराष्ट्र

७) _______ ही शासकीय हवाई संस्था देशात हेलिकॉप्टर सेवा पुरविते.
१) एअर इंडिया     २) इंडियन     ३) पवनहंस    ४) पवनसूत

८) भारतात ज्वारी पिकाखालील क्षेत्रापैकी ________ इतके सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.
१) २५ टक्के     २) ३५ टक्के     ३) ५० टक्के     ४) ६५ टक्के

९) तांदळाच्या उत्पादनात भारतात ________ हे राज्य आघाडीवर आहे.
१) तामिळनाडू      २) गुजरात     ३) पंजाब      ४) प. बंगाल

१०) सातत्याने पात्र बदलणारी _______ ही नदी 'बिहारचे दु:खाश्रू' म्हणून ओळखली जाते.
१) कोसी     २) गंडक     ३) घाग्रा       ४) ब्रह्यपूत्र

११) भारतात लिंग गुणोत्तर (Sex Ratio) निश्चित करताना ______ पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते.
१) १०      २) १००     ३) १०००     ४) १०,०००

१२) भारतातील सर्वाधिक (शंभर टक्के) साक्षरता असणारे राज्य कोणते?
१) दिल्ली    २) केरळ    ३) महाराष्ट्र      ४) पश्चिम बंगाल

१३) भारतात ______ या वर्षापासून दर दहा वर्षांनी नियमितपणे जनगणना पार पाडली जाते.
१) १८७२     २) १८८१     ३) १८९१     ४) १९०१

१४) २०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची पहिली चार राज्ये उतरत्या क्रमाने असलेला पर्याय निवडा.
१) उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल    २) उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल
३) पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार    ४) उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार

१५) २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील _______ राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येची नोंद झाली आहे.
१) आंध्र प्रदेश     २) तामिळनाडू      ३) उत्तर प्रदेश     ४) मध्य प्रदेश

१६) भारतात आजमितीस _____ घटक राज्ये व _______ केंद्रशासित प्रदेश आहेत.
१) २५ व ९      २) २८ व ७     ३) २८ व ९      ४) २८ व १०

१७) भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते?
१) अरुणाचल प्रदेश     २) गोवा      ३) सिक्कीम     ४) नागालँड

१८) ______ हा भारतातील प्राचीन वली पर्वत (अवशिष्ट पर्वत) गणला जातो.
१) अरवली     २) हिमालय      ३) सातपुडा     ४) सह्याद्री

१९) भारतात ______ या प्रकारच्या लोहखनिजाचे साठे सर्वाधिक आढळतात.
१) हेमेटाईट      २) मॅग्नेटाईट      ३) लिमोनाईट    ४) सिडेराईट

२०) तामिळनाडूतील नेवेली येथे उत्तम प्रतीचा ______ हा कोळसा मिळतो.
१) पीट      २) लिग्नाइट      ३) बिट्युमेनी     ४) अँथ्रासाईट

उत्तर :
१) १    २) १     ३) ३     ४) २     ५) ४     ६) ३     ७) ३     ८) ३     ९) ३      १०) १     
११) ३    १२) २     १३) २     १४) २     १५) ३     १६) २    १७) ३     १८) १     १९) १    २०) २

Monday, September 8, 2014

MPSC Sample Question Paper 66

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न
१) ________ नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले 'माजुली' हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे.
१) तुंगभद्रा     २) महानदी      ३) ब्रह्यपुत्रा      ४) सिंधू

२) व्यक्तिगत भ्रमणध्वनीधारकांच्या (मोबाईल फोन) संख्येत भारताचा सध्या जगात कितवा क्रमांक लागतो?
१) सहावा      २) आठवा     ३) दहावा      ४) बारावा

३) म्यानमार या शेजारी राष्ट्राशी भारतातील ________ या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध आहेत.
१) गुजरात      २) तामिळनाडू     ३) पश्चिम बंगाल     ४) आंध्र प्रदेश

४) जून २०११ मध्ये ________ राज्यातील हेजामारा येथे देशातील पहिली जातीवर आधारित जनगणना झाली.
१) सिक्किम     २) मेघालय     ३) आसाम      ४) त्रिपुरा

५) भारतात _________ या वर्षी आकाशवाणीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
१) १९२७     २) १९३६     ३) १९५७     ४) १९७५

६) _______ हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील उत्तम नैसर्गिक बंदर आहे.
१) मुंबई     २) कांडला    ३) अलेप्पी    ४) विशाखापट्टणम्

७) भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
१) दिल्ली-मुंबई    २) चेन्नई-मुंबई     ३) पुणे-विजयवाडा     ४) वाराणसी-कन्याकुमारी

८) पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत भारताचा ______ क्रमांक लागतो.
१) दुसरा      २) तिसरा     ३) चौथा     ४) पाचवा

९) उत्तर प्रदेशातील _______ या अणुविद्युत प्रकल्पात काही वर्षांपूर्वी आगीची दुर्घटना घडली होती.
१) कलोल     २) नरोरा     ३) नरेगा      ४) कैगा

१०) ______ या खनिज तेल क्षेत्राच्या परिसरात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
१) अंकलेश्वर      २) नाहरकटिया    ३) मुंबई हाय      ४) तुर्भे

११) भारतात __________ या कोळशाचा वापर सर्वाधिक केला जातो.
१) पीट     २) लिग्नाइट      ३) बिट्युमेनी       ४) अँथ्रासाईट

१२) भारतात तांबे या धातूचे साठे मर्यादित असल्याने अधिक गरज भागविण्यासाठी ते आयात करावे लागते, तर _____ या धातूचे साठे अधिक असल्याने ते निर्यात केले जाते.
१) लोह       २) मँगनीज     ३) बॉक्साईट      ४) शिसे

१३) गोड्या पाण्यातील मासेमारीच्या बाबतीत भारतात _______ या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.
१) महाराष्ट्र     २) प. बंगाल     ३) गुजरात     ४) केरळ

१४) भारतात एकूण गहू उत्पादनापैकी सर्वाधिक (३५ टक्के) उत्पादन _______ या राज्यात होते.
१) पंजाब     २) हरियाणा     ३) राजस्थान     ४) उत्तर प्रदेश

१५) खाली भारतातील राज्ये (प्रदेश) व तेथील स्थलांतरित शेतीचे प्रकार यांची यादी दिली आहे. त्यांच्या योग्य जोड्या जुळविणारा उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
राज्य (प्रदेश)          स्थलांतरित शेतीचा प्रकार
अ) ईशान्य भारत         १) झूम
ब) केरळ                     २) बेवर
क) मध्य प्रदेश            ३) पोडू, डुंगर 
ड) ओरिसा                  ४) कुमरी
१) अ-४, ब-२, क-१, ड-३    २) अ-४, ब-३, क-२, ड-१    ३) अ-१, ब-४, क-२, ड-३   ४) अ-१, ब-२, क-३, ड-४

१६) भारतात एकूण जमिनीपैकी बिगर लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे?
१) २३ टक्के     २) ३३ टक्के     ४) ४६ टक्के      ४) ५५ टक्के

१७) तामिळनाडूतील कुडनकुलम या अणुविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे आंतरराष्ट्रीय सहकार्य लाभले आहे?
१) रशिया     २) जर्मनी     ३) फ्रान्स      ४) जपान

१८) महानदीवरील हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील _______ राज्यात आहे.
१) मध्यप्रदेश      २) पश्चिम बंगाल      ३) ओरिसा     ४) हरियाणा

१९) भारतात दामोदर खोरे विकास प्रकल्प ________ या वर्षी सुरू करण्यात आला.
१) १९४८      २) १९५१     ३) १९५५     ४) १९६१

२०) भारतात जलसंसाधनांच्या दृष्टीने महत्त्वाची अशी _______ नदीखोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात.
१) २०     २) २२     ३) २४     ४) ३२

उत्तर :
१) ३    २) ३     ३) ३     ४) ४     ५) २     ६) ४     ७) ४     ८) ४     ९) २      १०) ३     
११) ३    १२) २     १३) २     १४) ४     १५) ३     १६) ३    १७) १     १८) ३     १९) १    २०) ३

Wednesday, September 3, 2014

MPSC Sample Question Paper 65

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) १८७७ च्या दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास 'भारतीय सम्राज्ञी' (कैसर-ए-हिंद) किताब कोणी दिला?
१) लॉर्ड लिटन     २) लॉर्ड रिपन    ३) लॉर्ड लॅन्सडाऊन     ४) चालर्स अचिसन

२) जून १९८४ मध्ये ______ या मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला.
१) ऑपरेशन पोलो    २) ऑपरेशन ब्लू स्टार    ३) ऑपरेशन ग्रीन स्टार    ४) ऑपरेशन ग्रीन हिंट

३) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात पर्याय सुचविण्यासाठी ऑक्टोंबर १९६६ मध्ये _______ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाने नोव्हेंबर १९७१ मध्ये अहवाल सादर केला.
१) मोरारजी देसाई    २) डॉ. राधाकृष्णन    ३) डॉ. मेहरचंद महाजन    ४) यशपाल कपूर

४) ३ मे १९७१ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वाटहुकूमाव्दारे _____ विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले.
१) ७२      २) ८४      ३) १०६       ४) १२०

५) भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सर्वप्रथम कधी धारण केली?
१) १० जानेवारी १९६६   २) १९ जानेवारी १९६६    ३) २४ जानेवारी १९६६    ४) यापैकी नाही

६) १९६४ साली ______ येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी 'कोणत्याही देशाने अणुबॉम्बची निर्मिती, विकास वा चाचणी घेऊ नये' असे आवाहन केले.
१) बेलग्रेड      २) ब्रुनेई      ३) कोलंबी    ४) कैरो

७) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधी _______ धोरण स्वीकारले.
१) सुडाचे      २) उदासीनतेचे      ३) अलिप्ततावादाचे     ४) वसाहतवादाचे

८) १९५५ साली इंडोनेशियातील _______ येथे भरलेल्या आफ्रो-आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत पं. जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार करताना पंचशील तत्त्वे घोषित केली.
१) बांडुंग      २) ब्रुनेई      ३) बेलग्रेड     ४) हॅम्बूर्ग

९) १९५६ च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे ______ भाषिक राज्ये व ______ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली.
१) १४ व ५       २) १४ व ७     ३) १९ व ५     ४) १९ व ७

१०) १९५९ साली ______ यांच्या अध्यक्षतेखाली भारतात माध्यमिक शिक्षण आयोग नेमण्यात आला होता.
१) डी.एस. कोठारी     २) ए.एल. मुदलियार    ३) ड' राधाकृष्णन      ४) मौलाना आझाद

११) १९५२ साली पार पडलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत _______ पक्षांनी सहभाग घेतला होता.
१) २३     २) ५२     ३) ७७     ४) १०३

१२) संस्थानांच्या विलिनीकरणासंबंधीचा 'सामीलनामा' तयार करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना _____ यांचे अनमोल सहकार्य लाभले.
१) बलवंतराय मेहता    २) सैफुद्दीन अहमद    ३) व्ही. पी. मेनन    ४) राजगोपालाचारी

१३) सप्टेंबर १९२९ मध्ये लाहोर कटातील ______ या क्रांतीकारकाने ६४ दिवसांच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले.
१) बटुकेश्वर दत्त   २) बाबू गेनू     ३) शिरीषकुमार     ४) जतीनदास

१४) पाकिस्तान या स्वंतत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीसाठी ______ यांनी आपला व्दिराष्ट्र सिद्धांत मांडला.
१) आगाखान     २) नवाब सलिमुल्ला    ३) बॅ. जीना     ४) मोहम्मद इक्बाल

१५) 'बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश' या शब्दांत १९४२ च्या क्रिप्स योजनेवर कोणी टीका केली?
१) पं. जवाहरलाल नेहरू    २) पं. मोतीलाल नेहरू     ३) महात्मा गांधी     ४) मौलाना आझाद

१६) २१ ऑक्टोंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ______ या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले.
१) जर्मनी     २) जपान      ३) फ्रान्स     ४) सिंगापूर

१७) १९५७ साली भारतात _______ यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रीशिक्षणविषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला.
१) दुर्गाबाई देशमुख     २) इरावती कर्वे     ३) सरोजिनी नायडू      ४) हंसाबेन मेहता

१८) _____ या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लीम धर्मीयांचा खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो.
१) अफगाणिस्तान      २) पाकिस्तान      ३२) तुर्कस्तान     ४) व्हॅष्टिकन सिटी

१९) सविनय कायदेभंग आंदोलनावेळी वायव्य सरहद्द प्रांतात _______ ही संघटना आघाडीवर होती.
१) सरहद्द गांधी     २) खुदा-ई-खिदमतगार     ३) इंडियन असोसिएशन     ४) होमरुल लिग

२०) 'यंग बंगाल' या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
१) डिझरायली     २) सर हेन्री विव्हियन    ३) हेन्री कॉटन    ४) देवेंद्रनाथ टागोर

उत्तर :
१) १    २) २     ३) ३     ४) ३     ५) ३     ६) ४     ७) ३     ८) १     ९) १      १०) २     
११) ३    १२) ३     १३) ४     १४) ३     १५) ३     १६) ४    १७) १     १८) ३     १९) २    २०) २