Saturday, September 13, 2014

राज्यातील पोलिस प्रशासन Rajyatil police prashasan

१) पोलिस महासंचालक (Director General of Police) हे राज्यातील पोलिस खात्यातील सर्वोच्च पद असून ते पदोन्नतीने प्राप्त होते.
 
२) पोलिस हा राज्यांच्या अख्त्यारितील (राज्यसूचीतील) विषय असून राज्याच्या गृहमंत्रालायाच्या अख्त्यारित या विभागाचे कार्य चालते.
 
३) राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य पोलिस यंत्रणेवर आहे.
 
४) कंटक-शोधन, कंटक-निवारण व कंटक
 
५) पोलिस अधिक्षक (SP) व त्यावरील अधिकारी हे भारतीय पोलिस सेवेतील (IPS) वरिष्ठ अधिकारी असून त्यांची निवड संघ लोक संघ लोकसेवा आयोग व नेमणूक राज्य शासन करते.
 
६) पोलिस उपअधिक्षक (DySP) व सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) व नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते.
 
७) पोलिस उपनिरीक्षकांची (PSI) निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते.
 
८) पोलिस उपनिरीक्षकांची नेमणूक पोलिस मुख्यालयाकडून केली जाते.
 
९) गावपातळीवर पोलिस यंत्रणेस सहाय्य करण्यासाठी पगारी पोलिस पाटलाची नेमणूक केली जाते.
 
१०) राज्यात नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत (PTA) पोलिस उपनिरीक्षक, पोलिस उपअधिक्षक व सहाय्यक पोलिस आयिक्त या पदांसाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
 
११) तुरची (ता. तासगाव, जि. सांगली) येथे नव्याने स्थापन झालेल्या पोलिस प्रशिक्षण अकादमीत (PTA) २०११ - १२ पासून पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
 
१२) राज्यात पोलिस शिपायांसाठी (कॉन्स्टेबल्स) प्रशिक्षण केंद्रे खंडाळा, नाशिक, मरोळ (मुंबई), अकोला, नागपूर, जालना, तासगाव आदी ठिकाणी आहेत.
 
१३) भारतीय पोलिस सेवेतील (IPS) उच्चाअधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशात मसूरी येथे लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी व हैदराबाद येथे सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय अकादमी कार्यरत आहे.
 
१४) भारतात १९५५ साली सर्वप्रथम मुंबई राज्यात स्त्री-पोलिसांची नेमणूक करण्यात आली.
 
१५) राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या दशलाक्षी शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून पोलिस आयुक्ताल्यांची स्थापना करण्यात आली आहे.
 
१६) पोलिस आयुक्त हा भारतीय पोलिस सेवेतील उच्चाधिकारी पोलिस आयुक्तालयाचा प्रमुख म्हणून कार्य करतो.
-नियंत्रण या पद्धतीनी पोलिस यंत्रणा राज्यात कायदा व सुव्यवस्था राखते.

No comments:

Post a Comment