Friday, April 10, 2015

MPSC Sample Question Paper 83

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) 'आझाद हिंद सेने' च्या अधिकाऱ्यांवरील खटल्यात जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे वकीलपत्र (lawyer) घेतले होते. हे खटले खालीलपैकी कोठे चालविले गेले?
१) दिल्ली उच्च न्यायालयात   २) आर्याच्या किल्ल्यात    ३) दिल्लीच्या लाल किल्ल्यात         
४) अहमदनगरच्या किल्ल्यात

२) आझाद हिंद सेनेने अंदमान-निकोबार ही बेटे ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना ______ अशी नावे दिली होती.
१) सुभाष व जवाहर    २) गांधी व सुभाष    ३) शहीद व स्वराज्य    ४) आझाद व नेहरू

३) खालीलपैकी कोण 'गदर' हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवीत होते?
१) रासबिहारी बोस     २) श्यामजी कृष वर्मा     ३) लाला हरदयाळ     ४) स्वातंत्र्यवीर सावरकर

४) इ. स. १९०८ मधील टिळकांवरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
१) चित्तरंजनदास     २) गणेश वासुदेव जोशी     ३) बॅ. महंमदअली जीना     ४) दावर व मॅथ्यू

५) मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी ______ हा ग्रंथ लिहिला.
१) आर्क्टिक होम इन दी वेदाज     २) गीतारहस्य     ३) ओरायन     ४) प्रतियोतीगा सहकार

६) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे दरबार भरवून _______ यांनी बंगालची फाळणी रद्द केली.
१) व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन    २) सम्राट पंचम जॉर्ज    ३) राणी व्हिक्टोरिया     ४) लॉर्ड हार्डीग्ज

७) 'पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम सन १९३३ मध्ये 'नाऊ ऑर नेव्हर' या पुस्तकात वापरला गेला. हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते?
१) डॉ. महंमद इक्बाल    २) बॅ. महंमदअली    ३) रहमत खान    ४) सर सय्यद अहमदखान

८) सन १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय असंतोष प्रकट (dissatisfaction expressed) करण्यासाठी _______ या नव्या मार्गाची घोषणा केली.
१) असहकार      २) बहिष्कार    ३) सत्याग्रह     ४) प्रतियोगिता सहकार

९) जालियनवाला बाग, अमृतसर येथे
 निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार (inhuman Fire) करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव _______
१) जनरल डायर     २) ले. गव्हर्नर ओडवायर     ३) कमिशनर रँड      ४) ले. गव्हर्नर फुल्लर

१०) जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने _____ कमिशन नेमले होते.
१) हंटर      २) महात्मा गांधी     ३) सायमन      ४) जयकर

११) खालीलपैकी कोणाचा खिलाफत चळवळीस तीव्र वीरोध होता आणि हा अंतरराष्ट्रीय प्रश्न मुस्लीम लीगने दत्तक घेऊ नये, अशी प्रामाणिक भूमिका होती?
१) मौलाना आझाद    २) मौलाना शौकत अली     ३) बॅ. महंमद अली जीना     ४) सर सय्यद अहंमद खान

१२) 'रौलट बिलाविरुध्द गांधींनी सत्याग्रह सुरू केला त्यात भाग घेण्यासाठी मी हजर नव्हतो, ऐवढेच मला वाईट वाटते' हे उदगार कोणाचे?
१) लोकमान्य टिळक    २) पं. मोतीलाल नेहरू    ३) पं. जवाहरलाल नेहरू     ४) सुभाषचंद्र बोस

१३) कोणती जोडी चुकीची आहे?
१) स्वातंत्र्यवीर सावरकर : जोसेफ मॅझिनीचे चरित्र     २) आचार्य कृपालिनी : दी इंडियन स्ट्रगल
३) जवाहरलाल नेहरू : ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी    ४) डॉ. राजेन्द्रप्राद : दी साँग ऑफ इंडिया

१४) अन्हॅपी इंडिया' या पुस्तकाचे लेखक _______
१) दादाभाई नौरोजी     २) लाला लजपतराय    ३) मौलाना आझाद     ४) जवाहरलाल नेहरू

१५) ________ यांची 'जालियनवाला बाग' ही कविता एके काळी अत्यंत गाजली होती.
१) केशवसुत     २) कुसुमाग्रज     ३) गोविंदाग्रज     ४) यशवंत

१६) 'गांधी व्हर्सेस लेनिन' या पुस्तकाचे लेखक ______
१) श्रीपाद अमृत डांगे    २) नारायणराव लोखंडे     ३) राममनोहर लोहिया     ४) वसंतराव तुळपुळे

१७) दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यात महात्माजी ______ हे वृत्तपत्र चालवीत.
१) इंडियन ओपिनियन   २) दी सत्याग्रह      ३) इंडिया गॅझेट       ४) ब्लॅक्स अँड व्हाइट्स

१८) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म _______ येथे झाला.
१) रत्नागिरीजवळ चिखली    २) दापोलीजवळ आंबावडे     ३) इंदूरजवळ महू     ४) मराठवाड्यात औरंगाबाद

१९) खालीलपैकी कोणास आपण 'मुस्लीम लीग' चे संस्थापक म्हणून ओळखतो?
१) बॅ. महंमदअली जीना    २) आगाखान     ३) सर सय्यद अहमदखान      ४) नवाब सलिमुल्ला

२०) 'चौरीचौरा' येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली?
१) १९१९      २) १९२२     ३) १९२६       ४) १९३०

उत्तर :
१) ३    २) ३     ३) ३     ४) ३    ५) २     ६) २     ७) ३     ८) ४     ९) १     १०) १
११) ३   १२) १    १३) ४    १४) २    १५) २     १६) १    १७) १     १८) ३     १९) ४    २०) २

No comments:

Post a Comment