Monday, January 26, 2015

MPSC Sample Question Paper 80

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
१) १९५७        २) १९५८       ३) १९६१      ४) १९६२

२) खालीलपैकी कोणती संस्था त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीमधील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गणता येणार नाही?
१) ग्रामपंचायत       २) नगरपरिषद      ३) जिल्हा परिषद       ४) पंचायत समिती

३) बलवंतराव मेहता समितीने _______ शिफारस केली होती.
१) लोकशाहीच्या केंद्रीकरणाची    २) लोकशाहीच्या केंद्रीकरणाची    ३) अध्यक्षीय राज्यपद्धतीची    ४) धर्मनिरपेक्ष राष्ट्राची

४) _______ या अधिकाऱ्याचे ग्रामपंचायत सचिवावर नजीकचे नियंत्रण असते.
१) गटविकास अधिकारी    २) जिल्हाधिकारी      ३) मुख्य कार्यकारी अधिकारी     ४) तहसीलदार

५) खालीलपैकी कोणते काम ग्रामपंचायतीच्या आवश्यक अथवा नेहमीच्या कामात मोडत नाही?
१) रस्ते-सुधारणा     २) दिवाबत्ती     ३) सांडपाण्याची व्यवस्था     ४) शिक्षण

६) गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण _______ यांचे असते.
१) मुख्य कार्यकारी अधिकारी   २) जिल्हाधिकारी    ३) गटविकास अधिकारी वर्ग-१      ४) तहसीलदार

७) जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि महिला व बालकल्याण या समित्यांवर प्रत्येकी ______ सदस्य असतात.
१) ६      २) ८      ३) १०      ४) १२

८) पंचायत समितीस विकासाच्या योजना व अन्य कामांसाठी कोणाकडून अनुदान अदा केले जाते?
१) राज्य शासनाकडून    २) जिल्हा परिषदेकडून   ३) विभागीय आयुक्तांकडून     ४) यांपेक्षा वेगळे उत्तर

९) पंचायत समितीस आपल्या सभांचा संक्षिप्त कार्यवृत्तान्त दर _________ महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो.
१) तीन      २) चार      ३) सहा     ४) बारा

१०) जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील बाबींकरिता जिल्हा परिषदेने खर्चाची योग्य ती तरतूद करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत

समिती अधिनियम कलम _______ मध्ये स्पष्ट केले आहे.
१) ९५       २) ९७        ३) १००        ४) १०५

११) जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पध्दतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात?
१) ७ व १५     २) ४० व ५०      ३) ५० व ७५     ४) ३५ व ५०

१२) केंद्रीय स्तरावर नेमल्या गेलेल्या समित्यांमधील खालीलपैकी कोणती समिती पंचायतराज वा लोकशाही विकेंद्रीकरण या विषयाशी संबंधित नव्हती?
१) के. संथानम समिती, १९६३     २) जी.व्ही.के. राव समिती, १९८५     ३) सप्तर्षी समिती, २००२    ४) एल. एम. सिंघवी समिती, १९८६

१३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
२) जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
३) ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत.
४) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समित्तीचे पदसिद्ध सचिव असतात.

१४) _______ या राज्यांनी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील जिल्हा परिषद या सत्रास सर्वाधिक महत्त्व दिले आहे.
१) आंध्र प्रदेश व राजस्थान    २) राजस्थान व मध्य प्रदेश    ३) पश्चिम बंगाल व केरळ    ४) महाराष्ट्र व गुजरात

१५) पंचायतराज व्यवस्थेचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत अधिक अचूकरीत्या करता येईल?
१) स्थानिक शासनव्यवस्था    २) स्थानिक स्वयंशासन    ३) स्थानिक प्रशासन     ४) ग्रामीण स्थानिक स्वयंप्रशासन

१६) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी केव्हापासून लागू करण्यात आला?
१) १ जून, १९५८      २) १ जून, १९५९     ३) १ मे, १९५८     ४) १ मे, १९५९

१७) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ________ सभासद असतात.
१) ७      २) ९      ३) ११       ४) १५

१८) ग्रामसभेच्या दोन सभांदरम्यान ______ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटू देण्यास ग्रामपंचायत अधिनियमान्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
१) ६       २) ४      ३) ३      ४) २

१९) तालुक्यामधून अथवा गटामधून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्यांना पंचायत समितीवरही आपोआप प्रतिनिधित्व मिळते, हे विधान ___
१) चूक आहे.    २) अंशतः बरोबर आहे.    ३) बरोबर आहे.     ४) सुयोग्य आहे.

२०) ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त _______ सभासद असतात.
१) १७     २) २१      ३) १५       ४) २५

उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) १    ५) ४     ६) १     ७) २     ८) २     ९) ३     १०) ३
११) ३   १२) ३    १३) ४    १४) ४    १५) ४     १६) २    १७) १     १८) ३     १९) १    २०) १

No comments:

Post a Comment