Tuesday, February 10, 2015

MPSC Sample Question Paper 81

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न१) "ब्रिटिश शासन गाभ्यापासून सडलेले, भ्रष्टाचारी, जुलूम-जबरदस्ती
Force-force करणारे व संकुचित प्रवृत्तीचे आहे" या शब्दांत भारतीय राष्ट्रीय चळवळीत धडाडीने सहभागी झालेल्या _____ या आयरिश विदुषीने ब्रिटिश सरकारची संभावना केली.
१) मादाम कामा     २) डॉ. ऑनी बेझंट      ३) मागरिट नोबेल     ४) भगिनी निवेदिता

२) वेव्हेल योजनेच्या अपयशाचे वर्णन "भारतीय राजकारणाच्या प्रवाहाला अडथळा
disability आणणारा ऐतिहासिक बांध" या शब्दांत केले जाते; कारण _____
१) या योजनेने पाकिस्तानची मागणी मान्य केली.
२) या योजनेअन्वये मुस्लीम लीगला एक प्रकारे नकाराधिकार वापरण्याचाच हक्क मिळाला.
३) या योजनेअन्वये मुस्लीम लीगला भारतीय मुस्लीमांची एकमेव प्रातिनिधिक संघटना मानले गेले.
४) कॉंग्रेस आणि लीग या दोहोंना एकाच मापाने मोजण्यात आले.

३) 'दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' या ग्रंथात _______ या निवृत्त सनदी
retired IAS अधिकाऱ्याने इ.स. १७५७ पासूनच्या वसाहतवादी राजवटीच्या आर्थिक परिणामांचा तपशिलवार परामर्श घेतला आहे.
१) दादाभाई नौरोजी     २) रोमेशाचंद्र दत्त     ३) जी. सुब्रमण्यम अय्यर     ४) व्योमेशचंद्र बॅनर्जी

४) २६ मार्च, १९०२ रोजी ______ यांनी अंदाजप्रत्राकावरील आपले पहिले भाषण संसदेत केले आणि 'हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटू' म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली.
१) दादाभाई नौरोजी      २) जी.व्ही. जोशी     ३) गोपाळ कृष्ण गोखले     ४) फिरोजशहा मेहता

५) सन १८५७ च्या उठावाच्या वेळी ______ हे क्रांतिकारकांनी क्रांतिचे प्रतीक ठरविले होते.
१) जळता निखारा    २) लाल कमळाचे फूल      ३) तलवार      ४) गुलाबाचे फूल

६) ३० जून, १८५७ रोजी ______ यांना क्रांतिकारकांनी 'पेशवा'
Peshwa म्हणून जाहीर केले होते.
१) नानासाहेब      २) तात्या टोपे      ३) तिसरा बाजीराव     ४) चिमासाहेब

७) ______ या व्हाईसरॉयची तुलना मोगल अमदानीतील औरंगजेबाशी केली जाते.
१) लॉर्ड लिटन      २) लॉर्ड रिपन    ३) लॉर्ड कर्झन      ४) लॉर्ड कॅनिंग

८) आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत, असे जाहीर करणाऱ्या ______ या मुस्लीम समाजातील सुधारकाने मुस्लीम, हिंदू व ख्रिश्चन धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी पंजाबमध्ये 'अहमदीया'
ahamadiya ची स्थापना केली.
१) सर सय्यद अहमदखान  २) मौलवी चिरागअली ३) मिर्झा गुलाम महंमद ४) मौलवी लियाकतअली

९) 'मुंबई बेट' हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स _____
१) याने पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले.               २) याने मोगलांकडून जिंकून घेतले.
३) याच्या मते लंडनहून सुंदर शहर होते         ४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले.

१०) नवाबाच्या सत्तेचा आभासात्मक डोलारा कायम ठेवावयाचा; पण खरी सत्ता आपल्याच हाती ठेवावयाची अशा प्रकारची दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये ____ याने अमलात आणली.
१) रॉबर्ट क्लाईव्ह    २) वॉरन हेस्टींग्ज     ३) सर आयर कूट     ४) मॅक्फरसन

११) नाशिकचे जिल्हा न्यायाधीश जॉक्सन यांनी स्वा. सावरकरांचे वडील बंधू बाबाराव यांना २५ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा
Education of black water दिली होती. २१ डिसेंबर, १९०९ जोरी नाशिक येथे जॉक्सनचा वध करून त्याचा बदला ______ याने घेतला.
१) मदनलाल धिंग्रा     २) अनंत कान्हेरे      ३) वासुदेव गोगटे      ४) बाबू गेनू

१२) खालीलपैकी कोणी '१८५७ चे स्वातंत्रसमर' हा ग्रंथ लिहिला?
१) स्वातंत्रवीर सावरकर     २) लोकमान्य टिळक     ३) बाबाराव सावरकर       ४) न्यायमूर्ती रानडे

१३) कायदेमंडळाच्या निवडणुकांत भाग घेऊन कायदेमंडळात प्रवेश मिळविण्यासाठी __________ यांनी १ जानेवारी, १९२३ रोजी अलाहाबाद येथे 'स्वराज्य पक्षा' ची स्थापना केली.
१) चित्तरंजनादास व मोतीलाल नेहरू     २) न.चिं. केळकर व लाला लजपतराय     ३) चित्तरंजनदास व जवाहरलाल नेहरू    ४) मोतीलाल नेहरू व विठ्ठलभाई पटेल

१४) सन १९४२ च्या 'चले जाव' चळवळीचा समुदा कोणी तयार केला होता?
१) युसुफ मेहेरअली      २) अरुणा असफअली     ३) पंडित जवाहरलाल नेहरू      ४) सरदार पटेल

१५) ________ या भारतीय राजकीय विचारवंतास आपण 'पक्षविरहित राजकारण' या संकल्पनेचा जनक म्हणून ओळखतो.
१) फिरोजशहा मेहता    २) श्रीपाद अमृत डांगे      ३) मानवेंद्रनाथ रॉय     ४) एस. एम. जोशी

१६) सर व्हॅलेंटिन चिरोल हे लोकमान्य टिळकांना '_______' असे संबोधत.
१) तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी    २) भारतीय असंतोषाचे जनक     ३) बहिष्कार चळवळीचे जनक   
४) जहालवादाचे जनक

१७) सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन १९०४ मध्ये ______ ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली.
१) अभिनव भारत     २) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ     ३) क्रांतिसेना       ४) अनुशीलन समिती

१८) _______ यांनी लाहोर येथे 'दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज' ची स्थापना केली.
१) लाला हंसराज     २) लाला लजपतराय     ३) गुरुदत्त विद्यार्थी     ४) स्वामी श्रद्धानंद

१९) दिल्ली या नव्या राजधानीत प्रवेश करीत असताना व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यात आला; परंतु तो बचावला. हार्डिंग्जवर बॉम्ब कोणी फेकला होता?
१) सुभाषचंद्र बोस     २) रासबिहारी बोस    ३) अरविंद घोष     ४) लाला हरदयाळ

२०) स्वदेशीची चळवळ देशभर पसरविण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यावे लागते?
१) दादाभाई नौरोजी     २) सार्वजनिक काका     ३) बाळ गंगाधर टिळक      ४) न्या. म. गो. रानडे


उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) ३    ५) २     ६) १     ७) ३     ८) ३     ९) ४     १०) १
११) २   १२) १    १३) १    १४) ३    १५) ३     १६) २    १७) १     १८) १     १९) १    २०) ३

Saturday, January 31, 2015

भूमी व पाणी यांची उष्णता- ग्रहणक्षमता Bhūmī va pāṇī yān̄cī uṣṇatā- grahaṇakṣamatā

भूमी व पाणी यांच्या उष्णता ग्रहण करण्यात जो फरक असतो तो भूमी आणि जलाशयाच्या गुणधर्मांतील भिन्नतेमुळे आणि म्हणूनच भूमी आणि जलाशय भिन्न भिन्न प्रमाणात उष्णता ग्रहण करतात.
 
- पाण्याची विशिष्ट उष्णता ही भूमीच्या मानाने पुष्कळच जास्त असते. एक पौंड वाळूचे तापमान एक अंशापर्यंत वाढविण्यास जितकी उष्णता लागते त्यापेक्षा पाच पटीने जास्त उष्णता एक पौंड पाण्याचे तापमान एक अंशापर्यंत वाढविण्यास लागते.

- भूमीच्या मानाने पाण्याच्या पृष्ठभागावर पडणारी सूर्याची किरणे जास्त खोलीपर्यंत जाऊ शकतात. भू-पृष्ठापासून सुमारे एक मीटर खोलीनंतर भूमीच्या भागात दैनिक तपामानांत पडणारा फरक आढळत नाही. याउलट असा फरक जलाशयाच्या भागात पृष्ठभागापासून १८ मीटर खोलीपर्यंत देखील आढळतो.
 
- पाणी हे गतिशील असते. त्यात सारख्या हालचाली होत असतात. परंतु भूमीवर या प्रकारच्या हालचाली होत नाहीत. भूमी या दृष्टीने नेहमी स्थिर असते. त्यामुळे जलाशयावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमधील उष्णता सर्व भागात पसरविली जाते.
 
- सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयावर बाष्पीभवनाची क्रिया सतत घडत असते; त्यामुळे बरीचशी उष्णता या क्रियेत नाहीशी होते. परंतु या प्रकारची क्रिया भूमीवर बहुधा फारच थोड्या प्रमाणात घडते.
 
- पाण्याच्या पृष्ठभागावर पडणारी बरीचशी उष्णता प्रवर्तित होते व पाण्याचे तापमान वाढविण्यास तिचा मुळीच उपयोग होत नाही. भूमीवर या प्रकारची क्रिया बहुधा घडत नाही.

वातावरणातील हवेचे प्रवाह, घनीभवनाची अनुद्भूत उष्णता, हवेचे आकुंचन व प्रसारण, अभ्राच्छादित आकाश, पृष्ठभागाच्या विविधतेचा परिणाम.

Wednesday, January 28, 2015

लोकसंख्येविषयक धोरण Lōkasaṅkhyēviṣayaka dhōraṇa

अर्थव्यवस्थेचा व लोकसंख्येचा अनन्यसाधारण संबंध आहे. वाढत्या लोकसंख्येवर योग्य नियंत्रण ठेवले न गेल्यास होणारा विकास आणि साधनसंपत्तीतील वाढ ही वाढती लोकसंख्या खाऊन टाकते व विकासाची फळे दृष्टोत्पत्तीस येऊ शकत नाहीत, हे लक्षात घेता लोकसंख्याविषयक सुयोग्य व प्रभावी धोरणाची निकड स्पष्ट होते. ही निकड लक्षात घेऊन देशात पहिल्या पचवार्षिक योजनेच्या कालावधीपासूनच कुटुंबनियोजन कार्यक्रमवार भर देण्यात आला. सन १९५२ पासून देशात शासकीय स्तरावर कुटुंबनोयाजन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली गेली. सुरुवातीच्या काळात या कार्यक्रमाची अंमलबजावणी अतिशय धिम्या गतीने झाली. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये या कार्यक्रमासाठी अनुक्रमे फक्त रुपये ६५ लाख, रुपये ५ कोटी व रुपये २५ कोटी इतकीच तरतूद करण्यात आली होती.

Monday, January 26, 2015

MPSC Sample Question Paper 80

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
१) १९५७        २) १९५८       ३) १९६१      ४) १९६२

२) खालीलपैकी कोणती संस्था त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीमधील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गणता येणार नाही?
१) ग्रामपंचायत       २) नगरपरिषद      ३) जिल्हा परिषद       ४) पंचायत समिती

३) बलवंतराव मेहता समितीने _______ शिफारस केली होती.
१) लोकशाहीच्या केंद्रीकरणाची    २) लोकशाहीच्या केंद्रीकरणाची    ३) अध्यक्षीय राज्यपद्धतीची    ४) धर्मनिरपेक्ष राष्ट्राची

४) _______ या अधिकाऱ्याचे ग्रामपंचायत सचिवावर नजीकचे नियंत्रण असते.
१) गटविकास अधिकारी    २) जिल्हाधिकारी      ३) मुख्य कार्यकारी अधिकारी     ४) तहसीलदार

५) खालीलपैकी कोणते काम ग्रामपंचायतीच्या आवश्यक अथवा नेहमीच्या कामात मोडत नाही?
१) रस्ते-सुधारणा     २) दिवाबत्ती     ३) सांडपाण्याची व्यवस्था     ४) शिक्षण

६) गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण _______ यांचे असते.
१) मुख्य कार्यकारी अधिकारी   २) जिल्हाधिकारी    ३) गटविकास अधिकारी वर्ग-१      ४) तहसीलदार

७) जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि महिला व बालकल्याण या समित्यांवर प्रत्येकी ______ सदस्य असतात.
१) ६      २) ८      ३) १०      ४) १२

८) पंचायत समितीस विकासाच्या योजना व अन्य कामांसाठी कोणाकडून अनुदान अदा केले जाते?
१) राज्य शासनाकडून    २) जिल्हा परिषदेकडून   ३) विभागीय आयुक्तांकडून     ४) यांपेक्षा वेगळे उत्तर

९) पंचायत समितीस आपल्या सभांचा संक्षिप्त कार्यवृत्तान्त दर _________ महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो.
१) तीन      २) चार      ३) सहा     ४) बारा

१०) जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील बाबींकरिता जिल्हा परिषदेने खर्चाची योग्य ती तरतूद करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत

समिती अधिनियम कलम _______ मध्ये स्पष्ट केले आहे.
१) ९५       २) ९७        ३) १००        ४) १०५

११) जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पध्दतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात?
१) ७ व १५     २) ४० व ५०      ३) ५० व ७५     ४) ३५ व ५०

१२) केंद्रीय स्तरावर नेमल्या गेलेल्या समित्यांमधील खालीलपैकी कोणती समिती पंचायतराज वा लोकशाही विकेंद्रीकरण या विषयाशी संबंधित नव्हती?
१) के. संथानम समिती, १९६३     २) जी.व्ही.के. राव समिती, १९८५     ३) सप्तर्षी समिती, २००२    ४) एल. एम. सिंघवी समिती, १९८६

१३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
२) जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
३) ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत.
४) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समित्तीचे पदसिद्ध सचिव असतात.

१४) _______ या राज्यांनी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील जिल्हा परिषद या सत्रास सर्वाधिक महत्त्व दिले आहे.
१) आंध्र प्रदेश व राजस्थान    २) राजस्थान व मध्य प्रदेश    ३) पश्चिम बंगाल व केरळ    ४) महाराष्ट्र व गुजरात

१५) पंचायतराज व्यवस्थेचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत अधिक अचूकरीत्या करता येईल?
१) स्थानिक शासनव्यवस्था    २) स्थानिक स्वयंशासन    ३) स्थानिक प्रशासन     ४) ग्रामीण स्थानिक स्वयंप्रशासन

१६) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी केव्हापासून लागू करण्यात आला?
१) १ जून, १९५८      २) १ जून, १९५९     ३) १ मे, १९५८     ४) १ मे, १९५९

१७) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ________ सभासद असतात.
१) ७      २) ९      ३) ११       ४) १५

१८) ग्रामसभेच्या दोन सभांदरम्यान ______ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटू देण्यास ग्रामपंचायत अधिनियमान्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
१) ६       २) ४      ३) ३      ४) २

१९) तालुक्यामधून अथवा गटामधून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्यांना पंचायत समितीवरही आपोआप प्रतिनिधित्व मिळते, हे विधान ___
१) चूक आहे.    २) अंशतः बरोबर आहे.    ३) बरोबर आहे.     ४) सुयोग्य आहे.

२०) ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त _______ सभासद असतात.
१) १७     २) २१      ३) १५       ४) २५

उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) १    ५) ४     ६) १     ७) २     ८) २     ९) ३     १०) ३
११) ३   १२) ३    १३) ४    १४) ४    १५) ४     १६) २    १७) १     १८) ३     १९) १    २०) १

Monday, December 8, 2014

MPSC Sample Question Paper 79

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) खालीलपैकी कोण भारताच्या घटना समितीचे सदस्य नव्हते?
१) मौलाना आझाद    २) हमात्मा गांधी    ३) बाळासाहेब खेर    ४) गोविंद वल्लभ पंत

२) संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) राष्ट्रपती     २) सरन्यायाधीश    ३) पंतप्रधान     ४) मंत्रिमंडळ

३) "घटनेच्या तिसऱ्या प्रकरणात दिलेल्या मूलभूत हक्कांच्या तरतुदींसह घटनेच्या कोणत्याही भागासंदर्भात संसद घटनादुरुस्ती करू शकेल ...." या आशयाची तरतूद कितव्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली?
१) चोविसाव्या     २) सव्विसाव्या     ३) बेचाळिसाव्या     ४) चव्वेचाळिसाच्या

४) चौदाव्या लोकसभेतील निर्वाचित महिला सद्स्यांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर नमूद केली आहे?
१) ३४       २) ४४      ३) ५९       ४) ६९

५) घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे पुढे संमत केल्या जाणाऱ्या सर्व कायद्यांचा मूलाधार असावीत, असे _____ यांचे प्रतिपादन होते.
१) पंडित जवाहरलाल नेहरू    २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    ३) डॉ. राजेंद्रप्रसाद      ४) के. एम. मुन्शी

६) एखाद्या मंत्राविरुध्द अविश्वासाचा ठराव संसत झाल्यास _______
१) त्यास राजीनामा द्यावा लागेल    २) संपूर्ण मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागेल   ३) लोकसभा विसर्जित होईल.    ४) त्यास बडतर्फ केले जाईल.

७) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) राष्ट्रपतीस त्यांचे लष्करी अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात.
२) राष्ट्रपती संसदेच्या संमतीशिवाय युध्द पुकारू शकत नाहीत.
३) भारताच्या राष्ट्रपतींना अमर्याद लष्करी अधिकार आहेत.
४) राष्ट्रपती सैन्याच्या तीनही दलांचेसर्वोच्च प्रमुख असतात.

८) सर्वोच्च न्यायालयातील न्यायालय ____ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात.
१) ६५     २) ६२      ३) ६७      ४) ५८

९) घटनेच्या कितव्या कलमानुसार संसद आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील विषयांसंबंधी कायदे करू शकते?
१) २६३      २) २४९     ३) २४८      ४) २५०

१०) खालीलपैकी कोणते प्रकरण (case) घटनादुरुस्तीशी संबंधित नाही?
१) गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार.    २) स्वामी केशवानंद भारती विरुध्द भारत सरकार.
३) मिनर्व्हा मिल्स लिमिटेड विरुध्द भारत सरकार.  ४) वरील सर्व प्रकरणे घटनादुरुस्तीशी संबंधित आहेत.

११) खालीलपैकी कोणते न्यायालयीन प्रकरण संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराशी संबंधित नव्हते?
१) गोलकनाथ विरुध्द पंजाब सरकार    २) सज्जनसिंग विरुध्द राजस्थान सरकार
३) विद्यावती विरुध्द राजस्थान सरकार    ४) शंकरीप्रसादसिंग विरुद्ध भारत सरकार

१२) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारास रुपये ______ इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागते.
१) १०,०००/-       २) १५,०००/-      ३) २०,०००/-     ४) २५,०००/-

१३) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते ______ हे घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम होय; त्याशिवाय भारतीय घटनाच निरर्थक ठरली असती.
१) कलम १४ (समतेचा हक्क)    २) कलम १९ (स्वांतत्र्याचा हक्क)   ३) कलम ३२ (घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क)  ४) कलम २५ (धार्मिक स्वांतत्र्याचा हक्क)

१४) नागरी सेवा परीक्षा पद्धतीचे गुणांकन व तीमधील सुधारणा यांच्याशी संबंधित समिती खालीलपैकी कोणती?
१) पी. सी. जैन समिती     २) धर्मवीर समिती    ३) वाय. के. आलघ समिती     ४) पॉल अॅपलबी समिती

१५) भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) संसद     २) केंद्र लोकसेवा आयोग    ३) राष्ट्रपती     ४) पंतप्रधान

१६) राष्ट्रपतींस राजीनामा द्यावयाचा असल्यास ते तो उपराष्ट्रपतींना सादर करतात. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची सूचना उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणास देतात?
१) लोकसभा सभापती    २) पंतप्रधान      ३) मंत्रिमंडळ      ४) सरन्यायाधीश

१७) भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या उद्देश भारतात _____ स्थापन करणे हा आहे.
१) राजकीय लोकशाही    २) सामाजिक लोकशाही     ३) गांधीवादी लोकशाही    ४) आर्थिक आणि सामाजिक लोकशाही

१८) खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत एखाद्या घटक राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाही?
१) जर तो स्वतः राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असेल तर.   २) राज्याच्या विधानसभेत त्याने आपले बहुमत सिध्द केलेले नसेल तर.
३) जर त्याच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव दाखल झाला असेल तर.    ४) जर तो विधान परिषदेचा सदस्य असेल तर.

१९) खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राज्यपालास नाहीत?
१) राज्य लोकसेवा आयोग   २) मुख्यमंत्री    ३) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश    ४) मंत्रिमंडळ

२०) खालीलपैकी कोणत्या वर्षी लोकपाल विधेयक संसदेत प्रथम सादर करण्यात आले?
१) १९६६     २) १९६८    ३) १९७०      ४) १९७२

उत्तर :
१) २    २) २     ३) १     ४) २    ५) २     ६) २     ७) ३     ८) १     ९) ४     १०) ४
११) ३   १२) २    १३) ३    १४) ३    १५) ३     १६) १    १७) ४     १८) ४     १९) ३    २०) २

Saturday, November 29, 2014

क्षारांविषयी माहिती (salt information)

इंग्रजी नाव व्यावहारिक नाव मराठी नाव उपयोग
फेरस सल्फेट ग्रीन व्हिट्रिऑल हिराकस शाई व रंग उत्पादनासाठी
मॅग्नेशियम सल्फेट इप्सम सॉल्ट - औषधांमध्ये रेचक म्हणून कापड उदोगात रंगबंधक म्हणून
कॉपर सल्फेट क्ल्यू व्हिट्रिऑल मोरचूद जंतूनाशक, कवकनाशक, तांबे शुद्धीकरणात, डॅनिअलच्या विद्युत घटात द्रावण म्हणून
अमोनियम सल्फेट - - खत उद्योगात
पोटॅशिअम नायट्रेट नायटर किंवा बेंगॉल सॉल्ट पीटर सोरा बंदुकीची दारू, शोभेची दारू, खत उद्योगात
मॅग्नेशियम कार्बोनेत फ्रेंच चॉक - औषधात आम्ल प्रतिबंधक म्हणून सौंदर्यप्रसाधने, टुथपेस्टमध्ये
झिंक सल्फेट व्हाईट व्हिट्रिऑल - डोळ्यात घालवायचे औषध लिथोफोन हा पांढरा रंग निर्मिती
झिंक ऑक्साईड झिंक सफेदा - पांढरा रंग निर्मिती, रबर उद्योग, मलम निर्मिती
सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा - साबण, धुण्याचा सोडा, कागद उद्योगात पेट्रोलियम शुध्दीकारणात
पोटॅशियम अल्युमिनीअम सल्फेट - तुरटी जलशुध्दीकरण, कातडी उद्योग, कागद उद्योग रक्तस्त्राव रोखण्यासाठी पोटॅश तुरटीचा उपयोग
सिल्व्हर नायट्रेट लुनार कॉस्टिक - शाई, कलप निर्मिती, चांदीचे विद्युत विलेपन थर्मासमधील विलेपन
मर्क्युरस क्लोराईड Hg2Cl2 कॉलोमेल - औषधांमध्ये रेचक म्हणून विद्युत इलेक्ट्रोडमध्ये (कॅलोमेल)
मर्क्युरिक क्लोराईड - - जंतुनाशक, नेसलरचा अभिक्रियाकारक निर्मितीत. लाकडाचे वाळवीपासून संरक्षण.
अमोनियम क्लोरीड साल अमोनिअक - लेक्लांशेच्या विद्युत घटात
अमोनियम नायट्रेट - - गोठण मिश्रणात, खत उद्योगात
अमोनियम कार्बोनेट - - बेकिंग पावडर, कापड उद्योगात.
सिल्व्हर ब्रीमाईड - - छायाचित्रण उद्योगात
पोटॅशियम परमँगनेट - - जलशुद्धीकरणात जंतूनाशक
फॉस्फरस पेंटॉक्साईड - - निर्जलक म्हणून
लेड मोनॉक्साईड लिथार्ज शेंदूर काच आणि रंग उद्योगात
पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक पोटॅश - खत उद्योगात
कॅल्शियम सल्फेट जिप्सम - प्रयोगशाळांतून
मिथेन (CH4)  मार्श गॅस - ज्वलन
कार्बोनिल क्लोराईड फोस्जिन (Cocl2) - युद्धांमध्ये विषारी वायू
सोडियम सिलीकेट - जलकाच साबण उद्योगात भरण द्रव्य
फ्लिंट काच - प्रकाशीय काच प्रकाशीय उपकरणे, कृत्रिम हिरे बनवण्यासाठी

Tuesday, November 25, 2014

MPSC Sample Question Paper 78

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न

१) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता?
१) पंडित जवाहरलाल नेहरू    २) बॅ. महमदअली जीना   ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    ४) डॉ. सच्चिदानंद फिन्हा

२) भारतीय घटनेनुसार _________ सर्वभौस आहे.
१) संसद      २) भारतीय जनता    ३) न्यायसंस्था     ४) कार्यकारी मंडळ

३) "घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे." हे विधान......
१) संपूर्णत: चूक आहे.    २) पूर्णतः बरोबर आहे.   ३) विपर्यस्त आहे.     ४) संदिग्ध स्वरूपाचे आहे.

४) "घटनेतील कलम 'कलम ५१ ए' अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते." हे विधान......
१) संपूर्णतः चुकीचे आहे.   २) पूर्णतः बरोबर आहे.     ३) वस्तुस्थितीशी सुसंगत आहे.   ४) अंशतः बरोबर आहे.

५) घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
१) लोकसभा      २) कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा     ३) लोकसभा व राज्यसभा     ४) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा

६) भारतीय घटनेतील सर्वाधिक दुरुस्त्या ______ या कलमाशी संबंधित आहेत.
१) कलम १३      २) कलम १९     ३) कलम ३६८     ४) कलम ३५२

७) खालीलपैकी कोणत्या कलमान्वये आपल्या स्वतःच्याच निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यालायास आहे?
१) कलम १३७    २) कलम १७३      ३) कलम १४२     ४) कलम १७४

८) ______ या संघराज्य प्रदेशात व्दिस्तरीय पंचायतराज पद्धती अस्तित्वात आहे.
१) पुदुच्चेरी     २) दादरा व नगर-हवेली     ३) दिल्ली     ४) चंडिगढ

९) भारतीय संघराज्यात नवीन राज्य सामील करून घेण्याचा, नवीन राज्य प्रस्थापित करण्याचा अथवा राज्यपुनर्रचनेचा अधिकार संसदेस आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये हा अधिकार संसदेस प्राप्त झाला आहे?
१) दुसऱ्या      २) तिसऱ्या       ३) चौथ्या      ४) पाचव्या

१०) ________ म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
१) घटनेचा मसुदा     २) मार्गदर्शक तत्त्वे      ३) घटनेचा सरनामा      ४) लिखित घटना

११) खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींस नाहीत?
१) अॅटर्नी जनरल     २) कम्प्ट्रोलर अँड      ३) राज्यपाल       ४) उपराष्ट्रपती

१२) आर्टिकल ______ हे राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे.
१) १२३     २) ३६८      ३) ३५२     ४) ३७०

१३) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१) दर दोन वर्षांनी राज्यसभेतील एक-तृतीयांश सभासद निवृत्त होतात.
२) दर पाच वर्षांनी राज्यसभेवर नवीन सदस्य निवडून जातात.
३) राज्यसभेचे सभासद हे कायमचे सभासद असतात.
४) राज्यसभेवर सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताचे नागरिक नसले तरी चालते.

१४) साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त ______ इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात.
१) ९       २) १२      ३) २२     ४) ७८

१५) खालीलपैकी कोणती बाब राज्य शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे?
१) शेतजमिनीवरील वारसाकर   २) रेल्वेचे उत्पन्न     ३) कस्टम ड्युटी     ४) पोस्ट खात्याचे उत्पन्न

१६) खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही?
१) राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे    २) राष्ट्रगीताचा मान राखणे     ३) मतदानाचा हक्क बजावणे     ४) सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे

१७) भारताच्या लोकसभेमध्ये गणसंख्या गणसंख्या पुरी होण्यास किती टक्के सभासद उपस्थित असणे आवश्यक आहे?
१) २५ टक्के     २) १० टक्के      ३) २० टक्के       ४) ३३ टक्के

१८) भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील _______ हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.
१) घटनेचा सरनामा    २) मार्गदर्शक तत्त्वे      ३) मूलभूत कर्तव्ये     ४) मूलभूत हक्क

१९) राष्ट्रपतींनी मागविलेली माहिती त्यांना देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये (Article) नमूद केले आहे?
१) ७८      २) ७४      ३) ७५     ४) ७६

२०) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त ______ इतका काळ स्थानबध्द करता येते.
१) तीन महिने     २) एक वर्ष    ३) दोन वर्षे    ४) सहा महिने

उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) १    ५) ४     ६) १     ७) १     ८) २     ९) १     १०) ३
११) ४   १२) १    १३) १    १४) २    १५) १     १६) ३    १७) २     १८) १     १९) १    २०) १